नवी दिल्ली : देशभरात तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 97.81 रुपये आणि 89.07 रुपये प्रति लिटर असेल. मुंबईत पेट्रोलचे दर 84 पैशांनी वाढले असून, ते 112.51 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे आणि 85 पैशांच्या वाढीनंतर डिझेलचे दर प्रतिलिटर 96.70 रुपये झाले आहेत.
चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 76 पैशांनी वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 103.67 रुपये आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात 84 पैशांच्या वाढीनंतर पेट्रोलचा दर 106.34 रुपये प्रति लीटर झाला आहे आणि डिझेल 80 पैशांच्या वाढीनंतर 91.42 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चार महिन्यांच्या विरामानंतर चार दिवसांतील ही तिसरी वाढ आहे. मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली.
याआधी गुरुवारी, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ केली. दिल्लीत एक किलो सीएनजीची किंमत 59.01 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. IGL ने घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतीत गुरूवारपासून प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) 1 रुपयांनी वाढ केली आहे.
हेही वाचा : Kejriwal On 'The Kashmir Files'...तर 'द कश्मीर फाईल्स युट्युबर टाका; केजरीवाल यांचे भाषण व्हायरल