नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसह आता सीएनजीच्या किंमतीही वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आज डिझेलच्या दरात नऊ पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीत सीएनजीच्या किंमती आजपासून वाढविण्यात आल्या आहेत. यापूर्वी दिल्लीत सीएनजी प्रति किलो. 43.40 रुपये प्रतिकिलो मिळत होता, जो आता वाढून. 44.30 रुपये झाला आहे. तर, पीएनजीची किंमत प्रति एससीएम 29.66 वर पोहोचली आहे. नोएडामध्ये सीएनजीची किंमत आज 49.98 रुपये किलो झाली आहे.
दुसरीकडे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईमध्येही पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मुंबईत पेट्रोलने काही दिवसांपूर्वीच शतकेत्तर आकडा गाठला आहे. इतरही अनेक शहरांमध्ये तीच परिस्थिती आहे. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. दिल्लीत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या 17 पैशांनी वाढ केली होती.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती -
शहर | पेट्रोल | डीजल |
दिल्ली | 100.21 | 89.53 |
मुंबई | 106.25 | 97.09 |
चेन्नई | 101.06 | 94.06 |
कोलकाता | 100.23 | 92.50 |
राज्यातील महत्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती -
शहर | पेट्रोल | डिझेल |
मुंबई | 106.25 | 97.09 |
पुणे | 106.22 | 95.34 |
कोल्हापूर | 106.46 | 95.85 |
रत्नागिरी | 107.56 | 96.81 |
रायगड | 106.62 | 95.88 |
जळगाव | 107.69 | 96.76 |
परभणी | 108.92 | 97.94 |