ETV Bharat / bharat

Petrol, Diesel Prices : पेट्रोल, डिझेलची दर वाढ सुरुच, दर आठवडाभरात 4.91 रुपयांनी वाढले - हिंदुस्तान पेट्रोलियम. कॉर्पोरेशन लिमिटेड

मंगळवारी पेट्रोलच्या दर पुन्हा प्रतिलिटर 85 पैशांनी आणि डिझेलच्या दर 75 पैशांनी वाढले (Petrol, diesel prices hiked)आहेत, एका आठवड्यात एकूण दरांमध्ये ही सातव्यांदा दर वाढनोंदवली गेली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये आणि डिझेलचे दर 99.25 वर जाऊन पोचले पोचले आहेत. आठवडाभरात पेट्रोल 4.91 तर डिझेल 4.87 पैशाने (Petrol and diesel prices go up by Rs 5 a week) वाढले आहेत.

Petrol, Diesel Prices
पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Mar 29, 2022, 7:12 AM IST

Updated : Mar 29, 2022, 8:09 AM IST

नवी दिल्ली: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबरपासून देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Rates of petrol and diesel) स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान कच्च्या तेलाचे दर वाढल्या नंतरही किंमतीत बदल केला नव्हता. त्याचा फटका आता पहायला मिळत आहे. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा दीर्घ कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही सातवी वाढ आहे. आठवडा भरात या यापुर्वी सलग सहा वेळा दर वाढले आहेत. चौथी दरवाढ थेट प्रति लिटर 80 पैशांची होती. तर आजची पेट्रोलची सातवी दरवाढ मुंबईत 85 पैसे आणि डिझेसची 75 पैशांनी झाली आहे. त्यामुळे आठवडाभराच्या अंतरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 4.91 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.87 रुपयांनी वाढले आहेत.

दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे अनुक्रमे 80 आणि 70 पैशांनी वाढल्यामुळे दिल्लीतील पेट्रोलने शंभरी पार केली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 91.47 रुपये प्रति लिटर वर पोचले आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणे अपेक्षित होते, मात्र विरोधकांनी टीका केल्यामुळे दोन आठवड्यांनी दरवाढ करण्यास सुरु करण्यात आली आहे. आणि ती दररोजच होत आहे.

सरकारी मालकीचे इंधन विक्रेते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, (Indian Oil Corporation) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम. कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum. Corporation Limited) यांनी आता टप्प्याटप्प्याने आवश्यक भाव वाढ सुरु केली आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचा एकुण सुमारे USD 2.25 अब्ज (रु. 19,000 कोटी) महसूल बुडाला आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे

  • Price of petrol & diesel in Delhi at Rs 100.21 per litre & Rs 91.47 per litre respectively today (increased by 80 & 70 paise respectively)

    In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 115.04 & Rs 99.25 (increased by 85 paise & 75 paise respectively) pic.twitter.com/edmrj5xCou

    — ANI (@ANI) March 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Mar 29, 2022, 8:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.