नवी दिल्ली: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबरपासून देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Rates of petrol and diesel) स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान कच्च्या तेलाचे दर वाढल्या नंतरही किंमतीत बदल केला नव्हता. त्याचा फटका आता पहायला मिळत आहे. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा दीर्घ कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही सहावी वाढ (The sixth increase in rates) आहे. आठवडा भरात या यापुर्वी सलगपाच वेळा वाढल्या आहेत. चौथी दरवाढ थेट प्रति लिटर 80 पैशांची होती. आजच्या दरवाढी मुळे सात दिवसात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 4.06 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.12 रुपयांनी वाढले आहेत.
दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 99.41 रुपये प्रति लिटर आणि 90.77 रुपये प्रति लिटर (अनुक्रमे 30 आणि 35 पैशांनी वाढले) 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणे अपेक्षित होते, मात्र विरोधकांनी या विषयावर टीका केल्यामुळे दोन आठवड्यांनी दरवाढ करण्यास सुरु करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 137 दिवसांच्या अंतरात सुमारे USD 82 प्रति बॅरल वरून USD 120 पर्यंत वाढल्या तसेच किरकोळ किमतीतील वाढ झाली.
सरकारी मालकीचे इंधन विक्रेते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, (Indian Oil Corporation) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम. कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum. Corporation Limited) यांनी आता टप्प्याटप्प्याने आवश्यक भाव वाढ सुरु केली आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचा एकुण सुमारे USD 2.25 अब्ज (रु. 19,000 कोटी) महसूल बुडाला आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे
-
Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.41 per litre & Rs 90.77 per litre respectively today (increased by 30 & 35 paise respectively)
— ANI (@ANI) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 114.19 & Rs 98.50 (increased by 31 paise & 37 paise respectively) pic.twitter.com/ciy6wIFsGe
">Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.41 per litre & Rs 90.77 per litre respectively today (increased by 30 & 35 paise respectively)
— ANI (@ANI) March 28, 2022
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 114.19 & Rs 98.50 (increased by 31 paise & 37 paise respectively) pic.twitter.com/ciy6wIFsGePrice of petrol & diesel in Delhi at Rs 99.41 per litre & Rs 90.77 per litre respectively today (increased by 30 & 35 paise respectively)
— ANI (@ANI) March 28, 2022
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 114.19 & Rs 98.50 (increased by 31 paise & 37 paise respectively) pic.twitter.com/ciy6wIFsGe