नवी दिल्ली : श्रद्धा खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरो ( CBI ) कडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात ( Delhi High Court ) दाखल करण्यात ( Shraddha murder case to CBI ) आली आहे.दिल्लीच्या एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून तपास, प्रशासकीय, कर्मचारी कमतरतेमुळे तसेच पुरेशा तांत्रिक आणि वैज्ञानिक उपकरणांच्या अभावामुळे कार्यक्षमतेने करता येत नाही. घटना सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यामुळे पुरावे आणि साक्षीदार तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणांची गरज आहे.
-
Shraddha murder case | A practising lawyer moves a plea before Delhi High Court seeking transfer of investigation from Delhi Police to CBI. (1/2) pic.twitter.com/tcHxt5Sap4
— ANI (@ANI) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shraddha murder case | A practising lawyer moves a plea before Delhi High Court seeking transfer of investigation from Delhi Police to CBI. (1/2) pic.twitter.com/tcHxt5Sap4
— ANI (@ANI) November 21, 2022Shraddha murder case | A practising lawyer moves a plea before Delhi High Court seeking transfer of investigation from Delhi Police to CBI. (1/2) pic.twitter.com/tcHxt5Sap4
— ANI (@ANI) November 21, 2022
तपास सीबीआयकडे सोपवावा : एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिकाही दाखल केली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिका दाखल करत दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा तपास योग्य रितीने होत नाही. दिल्ली पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, तसेच त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्याची आणि उपकरणांचीही कमतरता आहे. त्यामुळे ६ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यास दिल्ली पोलीस सक्षम नाहीत, असे या याचिकेत म्हटले आहे.
आत्तापर्यंत या प्रकऱणात काय घडलं? : आरोपी आफताब अमीन पुनावाला याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत श्रद्धाचे तुकडे केल्याचे सांगितले. तसेच हे तुकडे आपण जंगलात टाकल्याचे सांगितले. आफताबने आपण गुन्हा कसा केला, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याबद्दल दिल्ली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलीस त्याला जंगलात घेऊन गेले, जिथे आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकले होते. त्यापैकी एका ठिकाणावरुन एक मानवी जबडा आणि तीन हाडे पोलिसांना सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाची आहेत की नाही, याचा डीएनए चाचणीच्या माध्यमातून शोध घेतला जाईल. आज आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहेत.