ETV Bharat / bharat

Person returns after 33 years : तब्बल 33 वर्षांनंतर हनुमान पोहोचले घरी, कुटुंबाच्या आनंदाला राहिला नाही पारावार... - 33 वर्षांनंतर हनुमान सैनी जिवंत

राजस्थानमधील अलवर बन्सूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तब्बल 33 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती जीवंत घरी परतली आहे. तो मृत झाल्याचे समजून कुटुंबीयांना धक्का बसला होता. कुटुंबीयांनी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र 2022 काढले होते. त्यांची पत्नी आपले पती ३३ वर्षानंतर परत आल्याने आनंदित झाल्या आहेत.

Person returns after 33 years
Person returns after 33 years
author img

By

Published : Jun 1, 2023, 7:03 PM IST

हनुमान सैनी आणि कुटुंबीय

अलवर (राजस्थान) - दिल्लीतील खारी बाओली येथे काम करत असताना 1989 मध्ये हनुमान सैनी अचानक घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी खूप शोध घेतला. मात्र तब्बल 33 वर्षांनंतर हनुमान सैनी जिवंत परतल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हनुमान सैनी यांना 5 मुले आहेत, ज्यामध्ये तीन मुली दोन मुले आहेत. सर्व विवाहित आहेत, बहिणी आणि मुली त्यांची आता विचारपूस करण्यासाठी घरी पोहोचल्या आहेत. लहान वयातच मुलांना सोडून गेलेले वडील परवाच म्हणजे ३० मे रोजी घरी परतले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सैनी यांच्या घरी त्यांची प्रकृती विचारण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचत आहेत. या ७५ वर्षीय हनुमान सैनी यांनी सांगितले की, कांगडा मातेने त्यांना बोलावले होते. माता मंदिरात पोहोचून त्यांनी मातेच्या मंदिरात पूजा आणि तपश्चर्या केली. तसेच 33 वर्षे तपश्चर्या करुन ते मातेच्या आदेशाने घरी परतले. हनुमान सैनी २९ मे रोजी रात्री दिल्लीहून खैरथळला रेल्वेने खैरथळला पोहोचले. तेथे बन्सूरला जाण्याचे कोणतेही साधन न मिळाल्याने रात्री पायी चालत तातारपूर क्रॉसिंगला ते पोहोचले. त्यानंतर सकाळी काही मार्ग काढून बन्सूरच्या स्वस्तीय हनुमान मंदिरात ते पोहोचले.

त्यानंतर ते घरी जाण्यास निघाले त्यावेळी त्यांना एकाने ओळखले. त्यांना त्यांच्या घरी नेले आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये सोडले. हनुमान सैनी यांना पाहून घरातील सदस्य आश्चर्यचकित झाले आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हनुमान सैनी यांच्या बहिणीला व मुलींना ही बाब समजताच त्यांनीही सासरच्या घरून येऊन वडिलांच्या तंदुरुस्तीची विचारपूस केली. हनुमान सैनीच्या नातेवाईकांमध्ये, हनुमान घरी परतल्याची माहिती मिळताच, नातेवाईकांची भेटण्यासाठी आता रीघ लागली आहे.

हनुमान सैनींच्या मुलांना 2022 मध्ये त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळाले.

माझ्या वडिलांची मी आशा सोडली होती. माझे वडील सापडत नसल्याने अखेर न्यायालयाचा आधार घेऊन २०२२ मध्ये माझ्या वडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले. कारण जमिनीशी संबंधित समस्यांमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे 2022 मध्ये वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्रही कोर्टाच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते. वडील जिवंत असण्याची आशा आम्ही सोडून दिली होती पण वडील घरी आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. - रामचंद्र सैनी, मुलगा

ते पुढे म्हणाले की, देवाचे आभार की आम्ही लहान होतो आणि आम्ही आमच्या वडिलांचे तोंडही पाहिले नव्हते. आज आम्हाला तो आनंद मिळाला. हनुमान सैनी आता घरी पोहोचले आहेत. हनुमान सैनी यांनी सांगितले की, त्यांच्या खिशात फक्त 20 रुपये होते. त्यावेळी रेल्वेत बसल्यावर TT माझ्याकडे आला. माझ्याकडे भाडे मागितले गेले. तेव्हा माझ्याकडे 20 रुपये होते. भाडे जास्त असल्याने TT नेच ट्रेनचे तिकीट दिले. तसेच पैसेही दिले. त्यानंतर पठाणकोटला पोहोचलो आणि हिमाचलमधील कांगडा माता मंदिरात पोहोचलो. जिथे मी 33 वर्षे मातेची सेवा आणि उपासना केली. पण माझी तपश्चर्या आणि पूजा पूर्ण झाल्यावर कांगडा मातेने घरी पाठवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आपण घरी आलो, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.