ETV Bharat / bharat

Karnataka: कुत्र्याचा वाढदिवस! कापला 100 किलोचा केक; पहा व्हिडीओ

author img

By

Published : Jun 23, 2022, 6:50 PM IST

एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस 100 किलोचा केक कापून साजरा केला आहे. तसेच, गावातील 5,000 लोकांसाठी 3 क्विंटल चिकन जेवण, 1 क्विंटल अंडी आणि शाकाहारी लोकांसाठी 50 किलो शाकाहारी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. बेळगावी जिल्ह्यातील मूदलगी तालुक्यातील तुक्कनट्टी गावातून हा प्रकार समोर आला होता.

कुत्र्याचा वाढदिवस! कापला 100 किलोचा केक

बेळगावी (कर्नाटक) - एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस 100 किलोचा केक कापून साजरा केला आहे. तसेच, गावातील 5,000 लोकांसाठी 3 क्विंटल चिकन जेवण, 1 क्विंटल अंडी आणि शाकाहारी लोकांसाठी 50 किलो शाकाहारी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. बेळगावी जिल्ह्यातील मूदलगी तालुक्यातील तुक्कनट्टी गावातून हा प्रकार समोर आला होता.

व्हिडीओ

शिवाप्पा यल्लाप्पा मार्डी, ग्रामपंचायत सदस्य आणि श्वान क्रिशचे मालक, यांनी त्यांच्या आवडत्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. केक कापल्यानंतर गावात कुत्र्याची परेडही करण्यात आली. गावातील लोकांनी या मिरवणुकीचा चांगलाच आनंद लुटला आहे.

कुत्र्याचा मालक शिवप्पा मार्डी हे गेल्या 20 वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. एकदा एका नवीन सदस्याने त्याच्या वाढदिवशी जुन्या सदस्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्या नवीन सदस्याने जुन्या सदस्यांचा अपमान केला की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कुत्र्यासारखे खाल्ले होते. अशा प्रकारे त्या सदस्याच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवप्पा यांनी कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

हेही वाचा - बंडखोरीनंतरही हे 13 निष्ठावंत आमदार आहेत उद्धव ठाकरेंसोबत, वाचा काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.