ETV Bharat / bharat

कोची युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमात चेंगराचेंगरी; चौघांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी - stampede

Kochi University Stampede : कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतील एका कार्यक्रमादरम्यान शनिवारी (25 नोव्हेंबर) चेंगराचेंगरी झाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतंय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 9:34 PM IST

Updated : Nov 25, 2023, 10:50 PM IST

कोची युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमात चेंगराचेंगरी

कोची(केरळ) Kochi University Stampede : कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CUSAT) मध्ये टेक फेस्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान तिथं चेंगराचेंगरी झाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू (Four People Died) झालाय. तर 50 हून अधिक जण जखमी झाले (Kochi University of Science and Technology) आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीमुळं बहुतांश लोक जखमी झाले आहेत. प्रसिद्ध गायिका भानुशाली 'टेक फेस्ट'चा एक भाग म्हणून कार्यक्रम करत असताना ही घटना (Cochin University of Science and Technology)घडली.

  • #WATCH | Kerala | Four students died and several others were injured in a stampede at CUSAT University in Kochi. The accident took place during a music concert that was held in the open-air auditorium on the campus.

    (Source: Students at the venue) pic.twitter.com/r0SnUAezdU

    — ANI (@ANI) November 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विद्यापीठाच्या सभागृहात होता कार्यक्रम : शनिवारी 'टेक फेस्ट'चा शेवटचा दिवस होता. कार्यक्रम झालेल्या सभागृहात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी आणि इतर मंडळी नाचत, गाणी गात जल्लोष करत कार्यक्रमाचा आनंद घेत असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं सभागृहाबाहेर असलेले लोक आत धावले व तिथं प्रचंड गर्दी जमा झाली होती. विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • #WATCH | Kerala | Additional Director General of Police (ADGP) M R Ajith Kumar says, "It is suspected that there was a college arts function being held by the school of engineering. The invitees were asked to come in black t-shirts...Due to sudden rain people who were at the… pic.twitter.com/9C2RLqCkP6

जखमींना रुग्णालयात केले दाखल : जखमींना जवळच्या कलामासेरी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र, यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्व जखमी हे विद्यापीठातील विद्यार्थी असल्याचे समजते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह इतर नागरिकही हजर होते.

  • #WATCH | Kochi | Four students died and several others were injured in a stampede at CUSAT University in Kochi. The accident took place during a music concert that was held in the open-air auditorium on the campus.

    (Outside visuals from the hospital) pic.twitter.com/ahz3hB8ZuR

यामुळे चेंगराचेंगरी झाली : मिळालेल्या माहितीनुसार, टेक फेस्ट या कार्यक्रमाला पासशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, सभागृहात प्रवेश देत असतानाच अचानक जोराचा पाऊस आला आणि गेटजवळ प्रचंड गर्दी झाली होती. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि बाहेर थांबलेले लोक आश्रय घेण्यासाठी सभागृहात घुसले आणि चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा - पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या

Last Updated : Nov 25, 2023, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.