ETV Bharat / bharat

पेगाससची हेरगिरी नवीन नाही.. 125 वर्षापासून होत आहे फोन टॅपिंग, अनेक सरकारांवर झाले आहेत आरोप - फोन टॅपिंग

पेगाससच्या स्पाइवेयर हेरगिरीच्या बातम्यांनी देशभरात खळबळ माजली आहे. मात्र हे पहिल्यांदाच नाही, की तंत्रज्ञानाच्या मदतीने आज लोकांवर नजर ठेवली जात आहे. जवळपास 125 वर्षापासून टॅपिंगच्या घटना होत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. भारतातही काँग्रेसच्या सत्ताकाळात फोन टॅपिंगवरून रणकंदन माजले होते, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

pegasus  snooping row
pegasus snooping row
author img

By

Published : Jul 20, 2021, 8:05 PM IST

हैदराबाद - 10 मार्च, 1876 रोजी अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावून थॉमस वॉटसन यांना पहिल्यांदा कॉल केला होता. ही टेलिफोन द्वारे केलेले पहिले संभाषण होते. ग्राहम बेल यांनी म्हटले होते, की मिस्टर वॉटसन, इकडे या मला तुम्हाला पाहायचे आहे. टेलिफोनचा शोध लावणाऱ्या ग्राहम बेल यांना तेव्हा कदाचित हा अंदाज नव्हता की, 21व्या शतकात टेलिकम्यूनिकेशन क्षेत्रात मोठी क्रांती होईल व कोणालाही पाहायचे असल्यास त्याला जवळ बोलावायची गरज राहणार नाही. लोक व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात राहतील. या गोष्टीची त्यांनी कल्पनाही केली नसेल की, लोक प्रायव्हसी कायम राखण्यासाठी आपले मोबाइल फोन बंद ठेवतील. मात्र हॅकर्स पेगासस स्पाइवेयरच्या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवतील.

द वायर मीडियाने दावा केला आहे की, पेगासस स्पाइवेयरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, राजकीय पक्षांचे नेते व मानवाधिकार कार्यकर्त्यांसह जवळपास 300 लोकांवर नजर ठेवली जात आहे. पेगासस स्पाइवेयरचे वैशिष्ट्य आहे, की ते मेसेज व लिंकशिवाय व्हॉइस कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्या मोबाइल फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकते. फोन बंद असल्यावरही व्हिडिओ व ऑडियो सक्रिय राखते. यामुळे मोबाइल फोन धारण करणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येक कृती हॅकर्सपर्यंत पोहोचते. दरम्यान सर्व डेटाही रेकॉर्ड केला जातो.

हेरगिरीसाठी 1895 मध्ये पहिल्यांदा केली वायर टॅपिंग -

टेलिफोनचा शोध लागल्यानंतर रेकॉर्डिंगची कल्पनाही लोकांना येऊ लागली. जेथे टेलिफोनचा शोध लागला तेथेच या कल्पना फळास येऊ लागल्या. 1876 मध्ये अमेरिकेचे ग्राहम बेल यांनी टेलिफोनचे पेंटंट केले होते. त्यानंतर 19 वर्षानंतर 1895 मध्ये वायर टॅपिंगची कल्पना न्यूयार्कमधील एका टेलिफोन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात आली. टेलिफोन विभागातील नोकरी सोडून त्याने पोलीस खात्यात नोकरी सुरू केली. न्यूयार्कचे तत्कालीन महापौर विलियम एल. स्ट्रॉन्ग यांना त्यांनी आपले विचार सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास यामुळे खूप मदत मिळेल. त्यानंतर महापौर खूश झाले व त्यांच्या कृपार्शिवादाने न्यूयार्कमध्येच अनेक वर्षे वायरटॅपिंग गुप्त पद्धतीने चालू राहिले. पोलीस टेलिफोन कंपनीच्या कार्यालयात जात व आपल्या केससंबंधित माहिती घेत. यामुळे पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना पकडले. टॅपिंगची लाइन विशेष करून तळघरात किंवा घराबाहेर एका बॉक्समध्ये असे. दुसऱया महायुद्धाच्या दरम्यान फोन टॅपिंग मोठ्या प्रमाणावर झाले.

टेलिफोनच्या विकासाचा इतिहास -

त्या काळात टेलिफोनचे पार्ट वेगवेगळे असत. रिसीव्हर, स्पीकर आणि ट्रान्समीटर वेग-वेगळे असत. 1927 मध्ये अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (एटी अँड टी)ने एक हँडसेट सादर केला. त्यामध्ये एक संयुक्त ट्रान्समीटर-रिसीवर व्यवस्था होती. रिंगर आणि टेलिफोन इलेक्ट्रॉनिक्स एका वेगळया बॉक्समध्ये होते. 1937 मध्ये पहिल्यांदा असा टेलिफोन बनला ज्याला संयुक्त सेट म्हटले जाऊ शकते. कंपनीने या सेटची 25 मिलियन पर्यंत उत्पादन केले. 1949 मध्ये कम्प्लीट टेलिफोन बाजारात आला. त्यामध्ये रोटरी डायलिंग होती, गोल चक्कर असणारी व त्यामध्ये बोट घालून नंबर डायल करावा लागत होता. 1960 च्या दशकात पुश-बटन डायलिंग सुरू झाले.

हेरगिरी प्रकरणात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना द्यावा लागला राजीनामा -

या संपर्क माध्यमाच्या विकासाबरोबरच टॅपिंग तंत्रज्ञानानेही प्रगती केली. पोलीस व गुप्तचर यंत्रणांवर टॅपिंगचे आरोप लागू लागले. 1969 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी मोठी धमाका केला. चार वर्षाच्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात केलेल्या कारनाम्याला जग वाटरगेट नावाने ओळखते. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टीची हेरगिरी केली. त्यांनी काही लोकांना डेमॉक्रेटिक पार्टीचे ऑफिस म्हणजे वॉटरगेट हॉटेल कॉम्प्लेक्सच्या हेरगिरीचे काम सोपवले. त्यांनी वॉटरगेट हॉटेल कॉम्प्लेक्समध्ये एक गोपनीय कॅमेरा लावला. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार रिचर्ड निक्सन यांनी डेमोक्रेट पार्टीच्या प्रत्येक हालचालींची माहिती मिळत होती. मात्र त्या डिव्हाइसने निवडणुकीच्या एक वर्ष आधीच काम करणे बंद केले. त्यानंतर त्याला दुरुस्त करण्यासाठी एक स्पेशल टीम बनवली गेली. टीम 17 जून, 1972 च्या रात्री डिवाइस दुरुस्त करण्यासाठी वॉटरगेट हॉटेल कॉम्प्लेक्स पोहोचली तेव्हा सर्वांनी पोलिसांनी अटक केली. यामुळे निक्सनच्या हेरगिरीचा पर्दापाश झाला. 30 ऑक्टोबर 1973 रोजी निक्सनच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला. 6 फेब्रवारी 1974 पासून महाभियोग प्रस्तावार सुनावणी सुरू झाली आणि 8 ऑगस्ट 1973 रोजी टीव्हीच्या लाईव्ह कार्यक्रमात निक्सनने आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना होती, एखादया राष्ट्राध्यक्षाला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच राजीनामा द्यावा लागत होता.

जवाहर लाल नेहरूंच्या काळातही फोन टॅपिंगची तक्रार -

केवळ अमेरिकेतच फोन टॅपिंगवरून खळबळ माजली नाही तर भारतातही इंग्रजांच्या काळापासून अशा तक्रारी होत आल्या आहेत. भारतात 1881 मध्ये सर्वात आधी ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेड इंग्लंड ने कोलकाता, मुंबई, मद्रास (चेन्नई) आणि अहमदाबाद येथे टेलिफोन एक्सचेंज स्थापन केले. 28 जानेवारी 1882 मध्ये एकूण 93 ग्राहकांसाठी टेलिफोन सेवा सुरू केली. मुंबईत 1882 मध्येच टेलिफोन एक्सचेंज तयार होते. स्वातंत्र्यानंतर पोस्ट खाते व संचार मंत्रालयही निर्माण केले गेले. तत्कालीन संचार मंत्र्यांनी जवाहरलाल नेहरूंकडे फोन टॅपिंगची तक्रार केली होती. लष्करप्रमुख जनरल के.एस. थिमय्या यांनी 1959 मध्ये फोन टॅप होण्याची आरोप केला होता. नेहरू सरकारमधील अन्य एक मंत्री टीटी कृष्णामाचारी यांनी 1962 मध्ये फोन टॅप झाल्याचा आरोप करून खळबळ माजवली होती.

अमर सिंह, नीरा राडिया, जेटली...सर्वांनी लावले टॅपिंगचे आरोप -

केंद्र सरकारकडून टॅपिंगचा फंडा राज्य सरकारांनीही वापरला. 1988 मध्ये कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्यावर विरोधी नेत्यांचे फोन टेप केल्याचा आरोप करण्यात आले. याचा परिणाम त्यांना आपली खुर्ची गमवावी लागली. समाजवादी पार्टीचे खासदार अमर सिंह यांनी 2006 मध्ये दावा केला की, इंटेलिजेंस ब्यूरोकडून त्यांचा फोन टॅप होत आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा फोन टॅप झाल्याच्या प्रकाराने खळबळ माजली होती. नीरा राडिया प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यावेळी 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्य़ाचा मुद्दा गरम होता. देशातील मोठ्या उद्योगपतींशी नीरा राडिया यांची झालेल्या बातचीतचे 800 टेप मिळाले होते. फेब्रवारी 2013 मध्ये अरुण जेटली यांनी टॅपिंगचा आरोप लावला होता. त्यावेळी जेटली राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. या प्रकरणात पोलिसांसह जवळपास 10 लोकांना अटक करण्यात आली होती. राजस्थानमध्ये नुकतेच एक प्रकरण पुढे आले आहे. तेथील अनेक आमदारांचे फोन टॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

1973 मध्ये मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी मोबाइल फोन बनवला. याचे वजन होते तब्बल दोन किलो. मात्र काळानुसार मोबाइल फोन स्मार्ट होत गेले. व्हिडिओ कॉलिंग व मिनिटात फाइल ट्रान्सफर शक्य झाले. आता 5जी मोबाइलचे युग आहे. नव्या जमान्यात कॉल रेकॉर्डिंग हॅकिंगमध्येही बदल झाले. हा बदल पेगासस सॉफ्टवेयरने स्पष्ट केला आहे.

भारतात इंडियन टेलिग्राफ अक्ट, 1885 च्या सेक्शन 5(2) नुसार केंद्र व राज्य सरकारांकडे केवळ फोन टॅपिंग करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या सरकारी विभाग जसे पोलीस किंवा आयकर विभागाला वाटते की एखाद्या परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होत आहे. तर ते फोन टॅपिंग करू शकतात. आयटी अक्टनुसार मोबाइल किंवा कम्प्यूटरमध्ये एखादा व्हायरस आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती चोरने बेकायदा आहे. हे हॅकिंगच्या श्रेणीमध्ये येते जे एक अपराध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.