ETV Bharat / bharat

Passport Temple in Kerala : केरळात आहे सरस्वतीचे अनोखं 'पासपोर्ट मंदिर', जाणून घ्या मंदिराची खासियत

Passport Temple : केरळचं प्राचीन अवनमकोड सरस्वती मंदिर हे श्रद्धेचं केंद्र आहे. पासपोर्ट मंदिर या नावानंही हे प्रसिद्ध आहे. विशिष्ट श्रद्धा आणि चालीरीती असलेलं हे अद्वितीय मंदिर आहे.

Passport Temple
Passport Temple
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 10:13 AM IST

अवनामकोड सरस्वती मंदिर

कोची (केरळ) Passport Temple in Kerala : केरळातील नेदुम्बसेरी विमानतळाच्या दक्षिणेला स्थित, दंतकथा आणि महान वारशाचा संगम म्हणजे अवनमकोड सरस्वती मंदिर आहे. हे केरळमधील प्रमुख सरस्वती मंदिरांपैकी एक आहे. जेथे विद्यारंभ सोहळा होतो. परंतु, अलीकडच्या काळात हे प्राचीन अवनमकोड मंदिर ‘पासपोर्ट मंदिर’ या नावानं प्रसिद्ध झालंय.

परदेशी प्रवासी देतात भेट : केरळ क्षेत्र सेवा ट्रस्टचे कोषाध्यक्ष सजीश के आर यांनी सांगितलं की, मंदिराजवळील नेदुम्बसेरी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर अनेक तरुण विमानतळावरून निघण्यापूर्वी इथं प्रगतीसाठी येऊ लागले, असं सांगितलं. परदेशात जाण्याची इच्छा असलेले लोक त्यांचे पासपोर्ट आणतात आणि मंदिरात पूजा करतात हे रोजचं दृश्य आहे. यासह, अवनामकोड सरस्वती मंदिर हे केरळ तसंच शेजारच्या राज्यात पासपोर्ट मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. ते पुढं म्हणाले की, अनेक प्रवासी या मंदिराला भेट देतात. विद्यार्थी या मंदिरातील विद्यारंभ समारंभात सहभागी होऊन येथून अभ्यासाला सुरुवात करतात. आदि शंकराचार्यांनी आपलं ज्ञानाचं पहिलं अक्षर याच अवनमकोड सरस्वती मंदिरात दिलं होतं, असं मानलं जातं.

  • हे मंदिर खास आहे : अवनमकोड स्वयंभू सरस्वती मंदिर हे त्या दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे, जिथं दररोज विद्यारंभ आयोजित केला जाऊ शकतो. विद्यारंभ मंदिराच्या 'वाल्या अंबलम्'मध्ये चालतं. पुढच्या अभ्यासात चांगली प्रगती व्हावी म्हणून फक्त मुलंच नाही तर वडिलधारी लोकंही येथे येतात. केरळमधील अवनामकोड सरस्वती मंदिर हे एक पवित्र ठिकाण आहे, जिथं शुभ समारंभाचे विधी होतात.

अनेक धारणा : देवी सरस्वतीला 'नवहू-मणि-नरायम' अर्पण केल्यास मुलं अस्खलितपणे बोलतील, चांगले शिकतील आणि त्यांचे हस्ताक्षर चांगले होईल, अशीही एक धारणा आहे. चार दशकांहून अधिक काळ मंदिरात नियमितपणे येणाऱ्या अम्मिनी अम्मा म्हणाल्या की, इथं दिलं जाणारं तूप सेवन केल्यास मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो. परीक्षेत चांगले गुण मिळू शकते. विमानतळावर टॅक्सी सेवा चालवणारे राधाकृष्णन म्हणाले, 'नेदुम्बसेरी विमानतळावर येणारे परदेशी नागरिकही या मंदिरात येतात. धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात.

  • मंदिराची वेळ काय : शतकानुशतकं जुन्या या देवी मंदिरात कोणतेही देव किंवा देवी नाहीत. एकच दगड असून त्याला 'दिव्य आत्मा' म्हटले जाते. पश्चिमेकडे तोंड करून देवीला चांदीचे वर्तुळ घातले जाते. विशेष दिवशी सोनेरी वर्तु देखील परिधान केलं जातं. मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडतं आणि सकाळी 10 वाजता बंद होतं. तर संध्याकाळी 5.30 वाजता उघडते आणि 7.30 वाजता बंद होते.

निसर्गरम्य परिसर : पूर्वी मुथामणाचं असलेलं हे मंदिर आता केरळ क्षेत्र सेवा ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केलं जातं. नेदुम्बसेरी विमानतळाजवळ, अवनमकोड मंदिर हे हिरवाईनं वेढलेलं एक भक्ति केंद्र आहे. मंदिराच्या प्रांगणात उभं राहून डोक्यावरून उडणारी आणि उतरणारी विमानं पाहणं हे एक वेगळंच दृश्य असतं. पासपोर्ट मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंदिरात येणाऱ्या भाविकांचं विमान उतरण्याच्या आणि टेक ऑफच्या आवाजानं स्वागत केलं जातं हे जाणून घेणं देखील मनोरंजक आहे.

हेही वाचा :

  1. Akshardham Hindu Temple : जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या हिंदू मंदिराचं अमेरिकेत होणार उद्घाटन
  2. Mukteshvar Mandir Juhu : जुहूचे मुक्तेश्वर मंदिर जागृत देवस्थान, मंदिराची 'अशी' आहे आख्यायिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.