ETV Bharat / bharat

कोरोनाचे नवे रुप घातक, ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांवर करडी नजर - mutated strain of the virus

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे जग पुन्हा हादरले आहे. मोठ्या संख्येने प्रवासी भारतात आले आहेत. यापैकी अनेक जणांना कोविडचा संसर्ग झाला आहे. सरकार सर्वांना ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन बाधित व्यक्तिच्या सॅम्पलमध्ये (जनुकीय संरचना) काही आनुवंशिक बदल झाले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे.

Coronavirus India Live Updates
सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Dec 27, 2020, 2:06 PM IST

Updated : Dec 27, 2020, 2:16 PM IST

हैदराबाद - सन् 2020 ची सुरुवात कोरोनाच्या गडद छायेत झाली. वर्ष संपायला येत असताना कोविडवर लस आली व सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता 2021 मध्ये सर्व काही सामान्य होणार व परिस्थिती पूर्व पदावर येणार, अशी आशा निर्माण झाली. मात्र, हा आनंद अल्पकाळच टिकला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जग पुन्हा एकदा हादरले आहे.

या नव्या स्ट्रेनवर 100 टक्के नियंत्रण मिळवता येईल, असा दावा कोरोनावर लस बनविणाऱ्या कंपन्या सुद्धा अद्याप करू शकलेल्या नाही. त्यांच्यासमोरही हा नवा स्ट्रेन एक मोठे आव्हान घेऊन उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार आधीच्या व्हायरसपेक्षा जास्त घातक आहे. या नव्या विषाणूचा संसर्गाचा वेग जास्त आहे. या भीतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत यूकेहून भारतात येणारी व त्याचबरोबर देशातून ब्रिटनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार एका व्यक्तीमध्ये आढळला. दुसऱ्या आठवड्यात या विषाणूत अनपेक्षितपणे खूप मोठे जनुकीय बदल झाल्याची पुष्टीही झाली. मात्र, ही पुष्टी होईपर्यंत ब्रिटनमधील लोक जगभरातील देशांमध्ये प्रवास करत होते. भारतही त्यांपैकी एक होता. त्यामुळे भारत सरकारने 25 नोव्हेंबरनंतर देशात आलेल्या सर्व ब्रिटिश नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी बंधनकारक केली. मुख्यत: अशा प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे जे २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटेनला गेले व त्यानंतर अन्य देशांतून प्रवास करत भारतात परतत आहेत.

ब्रिटेनहून केरळमध्ये आलेल्या 8 प्रवाशांना संसर्ग

केरळमध्ये ब्रिटेनहून आलेले 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे या राज्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. या आठही जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील इन्स्टीट्यूट ऑफ व्हॉयरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत. या तपासणीत कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये (जनुकीय संरचना) काही आनुवंशिक बदल झाले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे.

तेलंगाणामध्ये ब्रिटेनहून आलेल्या 18 जणांना कोरोना संक्रमण

ब्रिटेन येथून १२ डिसेंबरनंतर 1,200 लोक तेलंगाणाला आले. नुकतेच ब्रिटेनहून हैदराबादला परतलेले 7 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 18 आहे. या रुग्णांचे सॅम्पल सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) येथे पाठवण्यात आले आहेत. सीसीएमबी हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत येते.

आंध्र प्रदेशात परतले 6 कोरोनाबाधित

ब्रिटेनहून आंध्र प्रदेशला परतलेल्या 6 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आंध्रप्रदेशातील अधिकाऱ्यांनी ब्रिटेनहून परतलेल्या 1,214 लोकांना ओळखले आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत 1,158 लोकांची माहिती मिळवली असून उर्वरित 56 जणांची माहिती मिळवण्यात येत आहे. एकूण 1,101 ब्रिटेनहून परतलेल्या प्रवाशांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी 6 जण कोरोनाबाधित आहेत. पॉझिटिव्ह केसेसचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हॉयरोलॉजी आणि जीनोम सिक्व्हेन्सिंग टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरुन ब्रिटेनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शोध घेता येईल. 'जिनोम सिक्व्हेन्स' या प्रक्रियेत व्हायरसची जनुकीय संरचना बदलली आहे का याचा अभ्यास केला जातो.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ब्रिटेनहून आलेल्या 349 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 55 कल्याण तालुका येथे आले आहेत. त्यांना ट्रॅक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे महानगरपालिका सूत्रांच्या माहितीनुसार नागरी संस्थेला 134 व्यक्तींची यादी मिळाली आहे. यापैकी 72 जणांचा पत्ता मिळाला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेला प्रवाशांची एक यादी मिळाली आहे.

एअर इंडियाची फक्त एक फ्लाईट यूकेहून थेट कोलकाताला येत होती. ही साप्ताहिक उड्डाण होती. विमान 21 डिसेंबर 2020 ला कोलकाताला उतरले. या फ्लाईटमध्ये 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या दोघांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. फ्लाईटमध्ये एकूण 226 प्रवासी होते.

ब्रिटेनहून आलेली एअर इंडियाची एक फ्लाईट 23 डिसेंबरला अहमदाबादला पोहोचली. यामध्ये 270 प्रवाशी होते. यामध्ये ब्रिटिश नागरिकासह 5 जण कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद जिल्हा प्रशासनाकडून विमानतळावरील सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.

उड्डाण रद्द करण्यात आल्यानंतर एअर इंडिया आणि ब्रिटिश एअरवेजचे एकूण 478 प्रवाशी दिल्लीत होते. दिल्ली विमानतळावरील 5 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. कनेक्टिंग फ्लाईटने चेन्नईला जाणारी एक व्यक्तीही 22 डिसेंबर 2020 ला चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

भुवनेश्वरमधील एका 34 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. ही व्यक्ती नुकतीच यूकेहून परतली होती. या व्यक्तीला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त प्रेमचंद्र चौधरी यांनी सांगितले, की ही व्यक्ती 18 डिसेंबरला यूकेहून भारतात परतली. या व्यक्तीचे सॅम्पल सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

चेन्नईमध्ये ब्रिटेनहून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7 प्रवासी आणि क्रू यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंदूर येथे ब्रिटेनहून आलेल्या 2 लोकांना संसर्ग झाला आहे. कर्नाटक येथे यूकेहून आलेले 10 लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांचे सॅम्पल NIMHANS येथे पाठवण्यात आले आहेत. प्रभावित लोकांना नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाला आहे का याचा तपास येथे करण्यात येणार आहे.

ब्रिटेनहून जे प्रवासी लखनौला आले आहेत त्यांनाही ट्रेस करण्यात येत आहे. त्याची माहिती मिळवून तपासणी करण्यात येत आहे. दिलासादायक बाबही की ब्रिटेनहून परतलेल्या 93 प्रवाशांपैकी एकही कोविड पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मात्र, मेरठ येथील एका कुटुंबातील 3 सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या 26 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान 234 प्रवासी ब्रिटेनहून लखनौला आले.

ब्रिटेनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राजस्थान सरकारच्या डोकेदुखीत मात्र वाढ झाली आहे. मागील एका आठवड्यात 800 पेक्षा अधिक ब्रिटिश पर्यटकांनी राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला होता. त्यांना ट्रॅक करणे अवघड आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की सर्वात जास्त ब्रिटिश जयपूर येथे आले होते. त्यानंतर जोधपूर (73), अजमेर (70), अलवर (48), उदयपूर (43), कोटा (39), झुंझुनू (24), गंगानगर (38), राजसमंद (35) यासह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे.

Last Updated : Dec 27, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.