ETV Bharat / bharat

चक्क डोशावर पक्षाची चिन्हे! केरळ विधानसभा निवडणुकीतील रंगत - डोशावर पक्षाची चिन्हे कोल्लम

कोयता (सिकल), हातोडी (हॅमर), चांदणी (स्टार), हाताचा पंजा, अशा प्रकारचे पक्षाचे चिन्ह डोशावर उतारण्यात येत आहे. टोमॅटो सॉस, गाजर आणि अंड्यातील बलक मिसळून हा डोसा लोखंडाच्या तव्यावर बनविण्यात येत आहे. मागणीनुसार, पक्षाच्या चिन्हासोबतच उमेदवाराचा चेहरेही उतारण्यात येत आहे.

party sign on dosa
डोशावर पक्षाची चिन्हे
author img

By

Published : Mar 22, 2021, 5:42 PM IST

Updated : Mar 22, 2021, 7:14 PM IST

कोल्लम (केरळ) - निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे प्रयोग केल्याची अशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. डिसेंबर 2020मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान, मास्कवर पक्षाची चिन्हे छापणे, हा एक ट्रेंड झाला होता. यानंतर आता आणखी एक प्रयोग समोर आला आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचा फोटो हा चक्क डोसा या खाद्यपदार्थावर काढला जात आहे. कोल्लम जिल्ह्यातील डोसा शॉपवर हा प्रयोग करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्लम बीच रस्त्यावरील हा प्रयोग लोकांना आकर्षित करत आहे.

डोशावर राजकीय पक्षाची चिन्हे.

हेही वाचा - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह!

डोशावर काय?

कोयता (सिकल), हातोडी (हॅमर), चांदणी (स्टार), हाताचा पंजा, अशा प्रकारचे पक्षाचे चिन्ह डोशावर उतारण्यात येत आहे. टोमॅटो सॉस, गाजर आणि अंड्यातील बलक मिसळून हा डोसा लोखंडाच्या तव्यावर बनविण्यात येत आहे. मागणीनुसार, पक्षाच्या चिन्हासोबतच उमेदवारांचे चेहरेही उतारण्यात येत आहे.

कोल्लम डावे लोकशाही आघाडी पक्षाचे उमेदवार आणि अभिनेते मुकेश यांचे पोट्रेट पहिल्यांदा डोसा या खाद्यपदार्थावर उतारण्यात आला. डोसा मास्टर संथोष आणि दुकानमालक श्याम दोघे मिळून हा प्रयोग करत आहेत. या दोघांनी पाच फूट लांबीच्या एकाच डोसावर ही कलाकृती उतरवली आहे. अशा ऑर्डर मिळाल्यास ते उमेदवारांना चवदार डोसावर चेहरा उतरवून देऊ शकतात, असे श्याम यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात काहीतरी वेगळं करण्याच्या विचाराने आम्ही हा प्रयोग केला, असे ते म्हणाले.

हेही वाचा - पणजी महापालिकेत भाजप आमदार बाबुश मोन्सेरात गटाला निर्विवाद वर्चस्व

डोशाला मिळाली प्रसिद्धी -

या प्रयोगाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. अनेक स्थानिक राजकारणी नेते आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते याठिकाणी भेट देत आहेत. तसेच त्यांच्या पक्षाची चिन्हे डोशावर उतरवून घेत आहेत.

Last Updated : Mar 22, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.