ETV Bharat / bharat

या फरशीवर पाणी टाकलं, की लगेच उकळतंय.. बघा यामागे काय आहे अद्भत चमत्कार - झारखंड न्यूज

झारखंडच्या कटकमदाग प्रखंडामधील मसरातू गावात एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. घरातील फरशीचा काही भाग अचानक गरम होत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं. मात्र, ही घटना जमीनीखाली असलेल्या आर्थींगमुळे घडत असल्याचे लक्षात आले.

झारखंड
झारखंड
author img

By

Published : May 29, 2021, 4:13 PM IST

Updated : May 29, 2021, 6:02 PM IST

हजारीबाग - तुमच्या राहत्या घरातील फरशी अचानक तापली तर, असा विचार कधी केलायं. मात्र, अशी अजब घटना झारखंडच्या कटकमदाग प्रखंडामधील मसरातू गावात घडली आहे. नुकतेच आलेल्या यास च्रकीवादळामुळे झारखंडच्या अनेक जिल्ह्यातील तापमान कमी झालयं. मात्र,मसरातू गावाच्या एका घरातील फरशीचा काही हिस्सा अचानक तापत असल्याची घटना घडली. त्या फरशीवर पाय ठेवल्यानंतर पायही गरम होत आहेत. अचानक फरशी का तापत आहे, हे कळत नसल्यामुळे कुटुंबीयही बुचकाळ्यात पडले. पाहता पाहता ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली.

हजारीबागमधील घटना....

यासंदर्भातील माहिती प्रशासनाला देण्यात आली. कटकमदाग प्रखंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देत आढावा घेतला. प्रकरण त्यांच्या लक्षात येत नसल्याने अधिकाऱ्यांनी भूगर्भशास्त्रज्ञांना गावात बोलवलं. भूगर्भशास्त्रज्ञांनी घरातील जमिनीची पाहणी केली. घरातील जिन्याजवळील फरशीचा भाग गरम होत असल्याने, त्यामागे कारण शोधण्यासाठी तीथे मातीचे रिंगण करत पाणी टाकले. काही क्षणातच पाणीही उकळल्यासारखे गरम झाले. पाणी का गरम होत आहे, याचे कारण लक्षात येत नव्हते.

घरामध्ये कोठेही आर्थींगसाठी जागा नव्हती. तेव्हा जीन्याखाली असलेल्यात लोखंडाच्या तारांमध्ये करंट गेला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर वीज बंद करण्यात आली आणि पाणी तपासण्यात आले. तेव्हा जमिनीवरील पाणी सामान्य झाल्याचे लक्षात आले. आर्थींगमुळेच हा प्रकार घडला असावा, हे लक्षात घेऊन जमीन उकरून वीज व्यवस्था दुरुस्त करण्यात आली आहे.

Last Updated : May 29, 2021, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.