मुंबई आज जगभरात पारशी दिन साजरा करण्यात येत आहे Parsi New Year पारशी धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे इस्लाम धर्म प्रचलित होण्याआधी इराणमध्ये पारसी धर्म प्रचलित होता सातव्या शतकात मुस्लिम शासकांनी Muslim rulers इराणमध्ये पारसी समुदायाचा Parsi community पराभव केला आणि तेथील पारशी नागरिकांचा छळ करायला सुरूवात केली . साम दाम दंड भेदाचा वापर करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले त्यातील काही इराणी नागरिकांनी इस्लामचा स्वीकार केला नाही ते बोटींच्या सहाय्याने भारत आणि इतर देशांत पळून गेले Parsi community migration गुजरातच्या किनारपट्टीवरील नवसारी येथे स्थायिक झाले सध्या भारतात त्यांची संख्या सुमारे एक लाख आहे त्यापैकी 70 टक्के मुंबईत राहतात
भारतात सर्व धर्मियांसाठी एकोप्याचे वातावरण जेव्हा इराण आणि इतर मुस्लिम देशांमध्ये पारशी लोकांवर अत्याचार होत होते तेव्हा भारतात सर्व धर्मियांसाठी एकोप्याचे वातावरण होते हेच कारण आहे की आज जगातील सर्वाधिक पारशी लोक भारतात राहतात इतकेच नाही तर पारसी लोकांनी भारताची एकोप्याची सहिष्णुतेची भानवा त्यांना आवडली कालांतराने ते इथेच स्थायिक झाले भारताच्या स्वातंत्र्य चळवळी अर्थव्यवस्था मनोरंजन सशस्त्र सेना आणि इतर क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले त्यांनाच आपण पारशी किंवा इराणी म्हणतो
इ स पूर्व ७६६मध्ये भारतात दाखल असे म्हटले जाते की पारशी समुदाय मुस्लिमांच्या हुकूमशाहीला कंटाळून इ स पूर्व ७६६ च्या सुमारास दमण आणि दीव येथे पोहोचला दीव येथून ते गुजरातमध्ये स्थायिक झाले. गुजरातमधील काही लोक मुंबईत स्थायिक झाले धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पारसी धर्म आणि समाज भारतीयांच्या जवळचे झाले पारशी 9व्या 10व्या शतकात भारतात आल्याचे ऐतिहासिक पुरावे संशोधकांच्या हाती आले आहेत भारतातील पहिल्या पारशी वस्तीचा पुरावा म्हणजे सुरतजवळ आढळला येथील अग्निस्तंभ अग्नीपूजा करणाऱ्या पारशी समुदायांनी बांधला इराणमधील काही हजार पारशी वगळता जवळजवळ सर्व पारशी आता भारतात राहतात आणि बहुतेक आता मुंबईत कायमस्वरूपी स्थायी झाले आहेत
भारतीय स्वातंत्र्याचे समर्थन पारशी लोक आधी शेती करून आपली उपजिवीका करायचे नंतर व्यापारात त्यांनी त्यांचे लक्ष केंद्रीत केले त्यातून त्यांचा फायदा होऊ लागला त्यानंतर त्यांनी उद्योगात आपले हात पाय पसरवले भारतीय जहाजबांधणीचे पुनरुज्जीवन केले. त्याचे प्रशिक्षण त्यांनी युरोपीयन नागरिकांकडून घेतले होते त्यांनतर त्यांनी सागरीदृष्ट्या भारताला प्रबळ करण्यासाठी भारतात दिले पारशी लोकांनी बांधलेली जहाजे ब्रिटिश नौदलाने British Navy विकत घेतली होती तोपर्यंत वाफेची इंजिने नव्हती फ्रामजी माणेकजी व माणेकजी बम्मनजी वगैरे ही पारशी नावे याबाबत प्रसिद्ध आहेत त्यांनी ब्रिटीश राजवटीशी सामान्य संबंध ठेवले पण भारतीय श्रद्धा आणि स्वाभिमान अबाधित ठेवून भारताला आपला देश मानून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचे समर्थन केले
हेही वाचा Independence Day सातार्यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण