ETV Bharat / bharat

खासदार निलंबन प्रकरण : विरोधकांचं संसदेसमोर आंदोलन, लोकशाही वाचवण्यासाठी दिल्या घोषणा

Parliament Winter Session 2023 : आज सकाळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार निलंबन प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत घोषणाबाजी केली.

Parliament Winter Session 2023
विरोधकांचं संसदेसमोर आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 11:25 AM IST

Updated : Dec 20, 2023, 11:43 AM IST

नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेत गदारोळ केल्यामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधक खासदारांनी संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आहे. या खासदारांनी 'लोकशाही बचाव'च्या घोषणबाजी करत खासदार निलंबन प्रकरणाचा निषेध केला.

  • #WATCH | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi, party President Mallikarjun Kharge and Congress MP Rahul Gandhi join the protest against the suspension of 141 Opposition MPs. pic.twitter.com/OG6AG3lD7W

    — ANI (@ANI) December 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनिया गांधी, राहुल गांधी आंदोलनात सहभागी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आआणि राज्यसभेत गदारोळ केल्यानं विरोधकांच्या तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळं देशभरात मोठी खळबळ उडाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन होण्याची ही पहिलीच घटना होती. आज सकाळीच विरोधी खासदारांनी संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढं एकत्र येत आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदींसह 'इंडिया' आघाडीतील विरोधक खासदारांनी आंदोलन केलं.

खासदारांची जोरदार घोषणाबाजी : संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांच्या मुद्द्यांवरुन आज विोरधक चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळं विरोधक खासदारांनी संसदेत मोठी घोषणाबाजी केली. लोकशाही बचाव, अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधक खासदारांनी आंदोलन केलं. या आंदोलनात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सहभागी होत एकत्र असल्याचं सरकारला दाखवून दिलं.

  • #WATCH | On suspension of 141 opposition MPs, LoP Rajya Sabha & Cong President Mallikarjun Kharge says, "We will continue our protest until the suspension of MPs is revoked..." pic.twitter.com/CBL5yWqjVR

  • #WATCH | AAP MP Raghav Chadha says, "In, yesterday's INDIA alliance meeting, West Bengal CM Mamata Banerjee & Delhi CM Arvind Kejriwal proposed the name of Congress chief Mallilkarjun Kharge as the PM face for the alliance...A decision will be taken after discussion & dialogue.… pic.twitter.com/qWw525Vsf3

संसद सचिवालयानं काढलं पत्र : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेतून 141 खासदार निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना संसदेच्या परिसरात येण्यास संसद सचिवालयानं पत्र जारी केलं आहे. या निलंबित खासदारांनी संसदेतील परिसरात किंवा गॅलरीत जाऊ नये, असं संसद सचिवालयानं या जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं संसदेच्या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेले खासदार आणखी आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

  1. खरगे यांना INDIA आघाडीचा चेहरा निवडण्यामागे काय आहे राजकारण? जाणून घ्या
  2. उदयनराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; मराठा आणि धनगर आरक्षणाची केली मागणी
  3. २०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव

Last Updated : Dec 20, 2023, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.