नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यांच्यासह शशी थरुर, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव याचंही निलंबन करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ खासदारांच निलंबन करण्यात आलं आहे. कदाचित संसदेच्या इतिहासात एकाच अधिवेशन काळात एवढ्या खासदारांचं निलंबन केल्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
-
#WATCH | On suspension of 92 Opposition MPs, NCP MP Supriya Sule says, "We were just asking for a reply (from the government on Parliament security breach incident) and a discussion in the House. This is an important issue but the government is running away from a discussion on… pic.twitter.com/73fQ19kCfl
— ANI (@ANI) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | On suspension of 92 Opposition MPs, NCP MP Supriya Sule says, "We were just asking for a reply (from the government on Parliament security breach incident) and a discussion in the House. This is an important issue but the government is running away from a discussion on… pic.twitter.com/73fQ19kCfl
— ANI (@ANI) December 19, 2023#WATCH | On suspension of 92 Opposition MPs, NCP MP Supriya Sule says, "We were just asking for a reply (from the government on Parliament security breach incident) and a discussion in the House. This is an important issue but the government is running away from a discussion on… pic.twitter.com/73fQ19kCfl
— ANI (@ANI) December 19, 2023
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेचं निलंबन : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभा सभापतींनी महाराष्ट्रातील दोन खासदारांचं निलंबन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं लोकसभा सभापतींनी निलंबन केलं. त्यांच्यासह लोकसभेतील अनेक खासदारांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. आज लोकसभा सभापतींनी राजदच्या खासदार डिंपल यादव, फारुख अब्दुल्ला, शशी थरुर, कार्ति चिदंबरम, मनीष तिवारी आदी 49 खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं.
-
Lok Sabha adjourned till 1230 hours as Opposition MPs continue to protest over issues of suspension of 92 MPs and Parliament security breach incident https://t.co/bPf5CUyVCk
— ANI (@ANI) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lok Sabha adjourned till 1230 hours as Opposition MPs continue to protest over issues of suspension of 92 MPs and Parliament security breach incident https://t.co/bPf5CUyVCk
— ANI (@ANI) December 19, 2023Lok Sabha adjourned till 1230 hours as Opposition MPs continue to protest over issues of suspension of 92 MPs and Parliament security breach incident https://t.co/bPf5CUyVCk
— ANI (@ANI) December 19, 2023
एनसीपीनं ट्विट करुन नोंदवला निषेध : शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या ट्विटर हॅण्डल वरून निषेधाची पोस्ट करण्यात आली आहे. सरकार लोकशाही विरोधात असून दडपशाहीच्या माध्यमातून खासदार निलंबित केले आहेत. केवळ खासदार निलंबित केले नसून थेट लोकशाहीला संसदेतून निलंबित केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सलग ७ वेळा संसदारत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणाऱ्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह खा. डाॅ. अमोल कोल्हे, खा. मोहम्मद फैजल यांचं दिल्लीत हिवाळी अधिवेशनात निलंबन होणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. ज्या भाजप खासदाराच्याच एका चुकीमुळे घुसखोरी होऊन संसदेची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यावर अधिवेशनात चर्चा करण्याची माफक मागणी होती. परंतु दडपशाहीने ही मागणी नाकारत याउलट विरोधी पक्षातील खासदारांवरच कारवाई होत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.
-
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाला तसंच भारतीय लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या सरकारकडून करण्यात आलं आहे. ही दडपशाही भारतीय लोकशाहीच्या विरोधात असून देशातील जनता जुलमी केंद्र सरकारचा संविधानविरोधी कारभार आता जाणून आहे. दडपशाही सरकारने केवळ खासदार निलंबित केले नसून इथे थेट लोकशाहीच संसदेतून निलंबित केली आहे. असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
-
कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या… pic.twitter.com/CsNUO5QCPO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या… pic.twitter.com/CsNUO5QCPO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या… pic.twitter.com/CsNUO5QCPO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023
संसद घुसखोरी प्रकरणात निलंबनांची कारवाई : संसदेच्या घुसखोरी प्रकरणात खासदारांनी सुरक्षेच्या मुद्द्यांवरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चांगल्याच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. आज सकाळी संसदेचं सत्र सुरू झाल्यापासूनच विरोधी खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र लोकसभेत सभापतींनी गदारोळ करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.
-
सलग ७ वेळा संसदरत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणा-या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणा-या एक जबाबदार लोकप्रतिनिधी खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह खा. वंदनाताई चव्हाण, खा. मोहम्मद फैजल, खा. डाॅ. अमोल कोल्हे यांचे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात निलंबन होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब… pic.twitter.com/CCjeKZr5SG
— NCP (@NCPspeaks) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सलग ७ वेळा संसदरत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणा-या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणा-या एक जबाबदार लोकप्रतिनिधी खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह खा. वंदनाताई चव्हाण, खा. मोहम्मद फैजल, खा. डाॅ. अमोल कोल्हे यांचे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात निलंबन होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब… pic.twitter.com/CCjeKZr5SG
— NCP (@NCPspeaks) December 19, 2023सलग ७ वेळा संसदरत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणा-या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणा-या एक जबाबदार लोकप्रतिनिधी खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह खा. वंदनाताई चव्हाण, खा. मोहम्मद फैजल, खा. डाॅ. अमोल कोल्हे यांचे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात निलंबन होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब… pic.twitter.com/CCjeKZr5SG
— NCP (@NCPspeaks) December 19, 2023
आतापर्यंतच्या निलंबन कारवाईचा इतिहास : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत दोन्ही सदनातील 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळीच संसदेतील सुरक्षा प्रकरणावरुन संसदेत प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं.
हेही वाचा :