ETV Bharat / bharat

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, 'या' विधेयकांवर होणार चर्चा

Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणाबाबत समितीच्या अहवालावर चर्चा सुरू होऊ शकते.

Parliament Winter Session 2023
Parliament Winter Session 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 11:21 AM IST

नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, 2023 यावर चर्चा होईल. ही दोन्ही विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी कनिष्ठ सभागृहात विचारार्थ आणि पारित करण्यासाठी मांडली होती.

कोणते ठराव होणार सादर : तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 लोकसभेत सादर करतील. तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 च्या अनुदानाच्या पुरवणी मागण्या दर्शविणारं विधान सादर करू शकतात. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश या सभागृहाच्या सदस्यांना राष्ट्रीय जूट बोर्डाचे सदस्य म्हणून काम करण्यासाठी त्यांच्यापैकी दोन सदस्यांची निवड करण्यास सांगणारा ठराव पारित करतील. याशिवाय भाजपाचे खासदार सुमेर सोलंकी आणि बिजू जनता दलाचे खासदार निरंजन बिशी हे 24 ऑगस्टपासून हॅवलॉक बेट, पोर्ट ब्लेअर, महाबलीपुरम आणि मुंबईतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणावरील समितीच्या अभ्यास दौऱ्याच्या अहवालावर चर्चा सुरू करू शकतात.

  • Winter Session Day 3 | Aam Aadmi Party MP Ashok Kumar Mittal and Shiv Sena MP Anil Desai are to lay on the table of the Rajya Sabha, a copy (in English and Hindi) of the Twenty-Fifth Report of the Department-Related Parliamentary Standing Committee on External Affairs…

    — ANI (@ANI) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसऱ्या दिवशी कोणत्या विधेयकांवर झाली चर्चा : आम आदमी पक्षाचे खासदार अशोक कुमार मित्तल आणि शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हेही सरकारनं केलेल्या कारवाईबाबत विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा (सतरावा लोकसभा) पंचविसावा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. 2023-24 या वर्षासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांबाबत समितीच्या विसाव्या अहवालात निरिक्षण आणि शिफारशी आहेत.

  • Congress MP Gaurav Gogoi gives adjournment motion notice in Lok Sabha, stating that "there is an urgent need to review the current situation and discuss the roadmap for bringing back peace and normalcy in Manipur."

हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरला संपणार- हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चा झाली. सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन विधेयके मांडून ती मंजूर करण्यात आली. राज्यसभेनं आप खासदार राघव चढ्ढा यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक 2023 वरील स्थायी समितीचा अहवालही दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरला संपणार आहे.

हेही वाचा :

  1. Winter Session 2023: सरकारी बँकांनी कर्जबुडव्यांकडून 33 हजार 801 कोटी केले वसूल-निर्मला सीतारामन
  2. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; 'या' मुद्द्यांवरुन अधिवेशन वादळी होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.