ETV Bharat / bharat

"पाकव्याप्त काश्मीर नेहरूंची चूक, कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं", अमित शाह यांचा लोकसभेतच आरोप - नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची समस्या

Amit Shah : पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची समस्या उद्भवल्याचा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतच केला आहे. ते लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर बोलत होते.

Amit Shah
Amit Shah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 7:14 PM IST

नवी दिल्ली Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानं काही लोक नाराज झाले असल्याचं अमित शाह म्हणाले. जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.

  • #WATCH | Union Home Minister Amit Shah says, "Two mistakes that happened due to the decision of (former PM) Pandit Jawaharlal Nehru due to which Kashmir had to suffer for many years. The first is to declare a ceasefire - when our army was winning, the ceasefire was imposed. If… pic.twitter.com/3TMm8fk5O1

    — ANI (@ANI) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले अमित शाह : जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा २०२३ आणि जम्मू-काश्मीर फेररचना दुरुस्ती विधेयक २०२३ ही ७० वर्षांपासून दुर्लक्ष झालेल्यांना न्याय देण्यासाठीची विधेयकं असल्याचं शाह यांनी सांगितलं. कलम ३७० सुमारे ४५ हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होतं. म्हणून मोदी सरकारनं ते कलम उखडून टाकल्याचा घणाघात शाहांनी केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची समस्या सर्वप्रथम उद्भवली. संपूर्ण काश्मीर आपल्या हातात न येता युद्धबंदी लागू केली गेली, अन्यथा तो भाग काश्मीरचाच राहिला असता, असा दावा त्यांनी केला आहे. शाह यांच्या या विधानानंतर सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केलं.

  • #WATCH | Union HM Amit Shah speaks on The Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2023 & The Jammu and Kashmir Reorganisation Bill, 2023

    He says, "...When terrorism tightened its grip, when everyone started being targeted and driven away, many people expressed their… pic.twitter.com/tov7Ua9ENA

एक चिन्ह आणि एक ध्वज असायला हवा : यावेळी बोलताना अमित शाहंनी, ३७० कलम हटवल्यानंतर दगडफेक करण्याचीही कोणाची हिंमत झाली नसल्याचा दावा केला. कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं. तसंच देशाचं एकच चिन्ह आणि एकच ध्वज असायला हवा असंही शाह म्हणाले. जम्मू-कश्मीरमध्ये सध्या ३ वर्षांसाठी शून्य दहशतवादाची भूमिका केंद्राची आहे. ही भूमिका २०२६ पर्यंत पूर्णपणे लागू केली जाईल असं अमित शाह यांनी सांगितलं.

    He says, "...Earlier there were 37 seats in Jammu, now there are 43. Earlier there were 46 in Kashmir, now there are 47 and in PoK,… pic.twitter.com/hYrAEgarVa

१९८० नंतर खोऱ्यात दहशतवादाचं युग आलं : यावेळी बोलताना अमित शाह यांनी काश्मिरी पंडितांंच्या प्रश्नालाही हात घातला. सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४६,६३१ कुटुंबं आणि १,५७,९६८ लोक त्यांच्याच देशात विस्थापित आहेत. हे विधेयक त्यांना अधिकार आणि प्रतिनिधित्व देण्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच १९८० नंतर खोऱ्यात दहशतवादाचं युग आल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

सरकार चर्चेसाठी तयार : लोकसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी गृहमंत्री अमित शाहंना, काश्मीर प्रश्नावर नेहरूंच्या योगदानाबाबत चर्चा करण्याचं आव्हान दिलं. भाजपाचे काही नेते नेहरूंवर काश्मीर प्रश्न योग्य पद्धतीनं हाताळत नसल्याचा आरोप करत असल्याचं ते म्हणाले. यावर अमित शाहंनी लगेच उत्तर दिलं. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. मणिपुरातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेनं हत्यारं टाकले, आतापर्यंतचा सर्वात मोठा शांतता करार
  2. "आम्हाला CAA लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही", अमित शाह बंगालमध्ये गरजले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.