ETV Bharat / bharat

संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 : संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांचा गोंधळ; 14 खासदार निलंबित - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Parliament Winter Session २०२३ : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गुरुवारी (14 डिसेंबर) संसदेत जोरदार गदारोळ केला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. लोकसभेच्या 13 आणि राज्यसभेचा एक अशा एकूण 14 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. हे निलंबन संसदेचं अधिवेशन सुरू असेपर्यंत असणार आहे. त्यामध्ये बहुतांश खासदार हे काँग्रेसचे आहेत.

Parliament Winter Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 11:22 AM IST

Updated : Dec 14, 2023, 7:16 PM IST

नवी दिल्ली Parliament Winter Session २०२३ : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली होती. त्यावेळी संसदेत विरोधकांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. या प्रकरणानंतर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल 14 खासदारांचं निलंबन करण्यात येत असल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं.

  • A total of 15 MPs suspended from the Parliament today for the remainder of the winter session - 14 from Lok Sabha and one from Rajya Sabha.

    (File pic) pic.twitter.com/q3ZXo8RDtb

    — ANI (@ANI) December 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधकांचा गदारोळ : बुधवारी संसदेच्या सभागृहात दोन घुसखोर घुसल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून, आज देखील संसदेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी कतारमध्ये अडकलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना कधी परत आणणार, यावरुन लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली. तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

एकूण 14 खासदारांचं निलंबन : आज संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील एकूण 14 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. हे निलंबन हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत असणार आहे. यातील 13 खासदार हे लोकसभेतील आहेत, तर 1 खासदार हे राज्यसभेतील आहेत. खासदार डेरेक ओ ब्रायन यांचंही निलंबन करण्यात आलंय. या निलंबनानंतर विरोधकांना सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Rajya Sabha adopts motion for suspension of TMC MP Derek O' Brien for the remainder part of the winter session for "ignoble misconduct" pic.twitter.com/A3MVk0Top9

निलंबित केलेले खासदार : 1. टीएन प्रथापन, काँग्रेस 2. हीबी एडेन, काँगेस 3. जोथिमनी, काँग्रेस 4. राम्या हरिदास, काँग्रेस 5. डीन कुरियाकोस, काँगेस 6. बेनी बेहनन, काँग्रेस 7. वी के श्रीकंदन, काँग्रेस 8. मोहम्मद जावेद, काँग्रेस 9. पीआर नटराजन, माकप 10. कनिमोई करुणानिधी, द्रमुक 11. के सुब्रमण्यन 12. एस वेंकटेशन, माकप 13. मणिकम टैगोर, काँग्रेस हे सर्व 13 खासदार हे लोकसभेचे आहेत. तर 15. डेरेक ओब्रायान (तृणमूल) हे राज्यसभेचे एक निलंबित खासदार आहेत.

डेरेक ओ ब्रायन यांचं निलंबन : राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी आपली मागणी लाऊन धरत मोठा गदारोळ केला होता. त्यामुळं डेरेक ओ ब्रायन यांना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित केलं आहे. खासदार डेरेक ओ ब्रायन यांचं निलंबन केल्यानं विरोधकांनी राज्यसभेतही मोठा गदारोळ केला. त्यामुळं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

  • #WATCH | On suspension of 15 MPs from the House, Congress MP Karti Chidambaram says, "What happened yesterday was a colossal security and intelligence failure. We want the government to come and inform the House on what happened yesterday and what are the steps that they are… pic.twitter.com/MGvhwvqRnX

काँग्रेस खासदार मनीष तिवारींनी दिला स्थगन प्रस्ताव : भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारमध्ये अडकले आहेत. त्यांना कतारनं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या अधिकाऱ्यांना भारतात परत आणण्यासाठी संसदेत चर्चा करावी, याबाबत काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे कतारमध्ये अडकलेल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांवरुन आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चांगलंच रणकंदन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी संसदेत घुसले होते तरुण : बुधवारी संसदेत दोन तरुण घुसल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यातील अमोल शिंदे हा संसदेबाहेर सापडला, हा तरुण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. दुसरा विकी शर्मा आहे. या तरुणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण गुरुग्राममध्ये थांबलेल्या विकी शर्मा याच्या घरीही दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा :

  1. संसदेत उड्या मारणारे युवक महुआ मोइत्रांची माणसं - खासदार नवनीत राणा
  2. संसदेत तरुणांची घुसखोरी प्रकरण : दिल्ली पोलिसांनी यूएपीए कायद्यांतर्गत केला गुन्हा दाखल, तरुणांची कसून चौकशी सुरू

Last Updated : Dec 14, 2023, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.