ETV Bharat / bharat

Parliament Special Session : नव्या संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी केली महिला आरक्षणाची घोषणा, मंजुरीची औपचारिकता बाकी - संसदेचं विशेष अधिवेशन 2023

Parliament Special Session : आज संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदारांनी नव्या संसद भवनात प्रवेश केला. नव्या संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' असं नाव दिलं. तत्पूर्वी, जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचं एकत्र फोटोशूट झालं.

Parliament Special Session
संसदेचं विशेष अधिवेशन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 1:14 PM IST

Updated : Sep 19, 2023, 2:14 PM IST

नवी दिल्ली Parliament Special Session : राजधानी नवी दिल्लीत सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आज नवीन संसद भवनात प्रवेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदार जुन्या संसद भवनातून पायी चालत नवीन संसदेत पोहोचले.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, Union Ministers Piyush Goyal, Nitin Gadkari and other parliamentarians enter the New Parliament building. pic.twitter.com/kis6atj56K

    — ANI (@ANI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' नाव दिलं : नव्या संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाची घोषणा केली. 'अटलजींच्या कार्यकाळात अनेक वेळा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं. पण ते मंजूर करण्यासाठी संख्याबळ गोळा करता आलं नाही, त्यामुळे स्वप्न अपूर्ण राहिलं. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देवानं मला निवडलं आहे', असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' असं नाव दिलं.

  • #WATCH | Special Session of Parliament | PM Narendra Modi speaks on Women's Reservation Bill -- Nari Shakti Vandan Adhiniyam

    "Discussion on Women's Reservation Bill happened for a long time. During Atal Bihari Vajpayee's regime Women's Reservation Bill was introduced several… pic.twitter.com/bPTniQvhZr

जुन्या संसदेत खासदारांचं फोटोशूट : मोदींनी नवीन संसद भवनातून खासदारांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मोदींनी चंद्रयान ३ आणि जी २० च्या यशाचा उल्लेख केला. 'विज्ञानाच्या जगात चंद्रयान ३ चं यश प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानास्पद आहे. भारताच्या नेतृत्वाखाली जी २० चं आयोजन गौरवास्पद होतं', असं ते म्हणाले. त्या आधी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांचं एकत्र फोटोशूट झालं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi says, "Today when we are entering the new Parliament building, when the 'grih pravesh' of Parliamentary democracy is taking place, the witness to the first rays of Independence and that which will inspire generations to come - the holy Sengol… pic.twitter.com/nmOP8guz1C

नवीन संसद भवनात नव्या भविष्याचा श्रीगणेश साकारू : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन केली. 'नवीन संसद भवनात नव्या भविष्याचा श्रीगणेशा आम्ही करणार आहोत', असं ते म्हणाले. १९४७ मध्ये येथेच ब्रिटिश सरकारनं सत्ता हस्तांतरित केली होती. हा सेंट्रल हॉलही त्या प्रक्रियेचा साक्षीदार आहे. आपलं राष्ट्रगीत आणि तिरंगा ध्वजही येथं स्वीकारण्यात आला. येथे चार हजारांहून अधिक कायदे बनले, असं मोदी म्हणाले.

  • #WATCH | In the Lok Sabha of the new Parliament building, PM Narendra Modi says, "Chandrayaan-3's skyrocketing success fills every countryman with pride. Under India's presidency, the extraordinary organising of G20 became an occasion to make unique achievements like getting the… pic.twitter.com/trDNNz6PZl

जुनी संसद 'संविधान सभा' म्हणून ओळखली जावी : पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या इमारतीला आपण केवळ जुनं संसद भवन म्हणून सोडून देऊ नये. सर्वांनी सहमती दर्शवल्यास भविष्यात ही इमारत 'संविधान सभा' म्हणून ओळखली जावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. 'जेव्हा आपण याला संविधान सभा म्हणतो, तेव्हा ते आपल्याला त्या महापुरुषांची आठवण करून देईल जे एकेकाळी संविधान सभेत बसायचे. भावी पिढ्यांना ही भेट देण्याची संधी सोडता कामा नये, असं मोदी म्हणाले.

महिला आरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी : मोदी मंत्रिमंडळानं सोमवारी विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के किंवा एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो-इंडियनसाठी ३३ टक्के कोट्यामध्ये उप-आरक्षणाचा प्रस्ताव आहे. तसंच प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर राखीव जागा फिरवल्या जाव्यात, असाही प्रस्ताव या विधेयकात आहे.

राज्यसभेत विधेयक मंजूर झालं आहे : केंद्र सरकार लवकरच हे विधेयक लोकसभेत मांडू शकते. महिला आरक्षण विधेयक सभागृहाच्या पटलावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा मुद्दा संसदेत १९९६ पासून अनेकदा उपस्थित झालाय. राज्यसभेत हे विधेयक २०१० मध्ये गदारोळात मंजूर झालं होतं. परंतु ते लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा', जाणून घ्या संपूर्ण तपशील
  2. Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर, सूत्रांची माहिती
  3. Parliament Special Session : रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated : Sep 19, 2023, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.