ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित - संसदेचे पावसाळी अधिवेशन 2023

संसदेचे मान्सून सत्राच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहासाठी वादाचा ठरला. दोन्ही सभागृहाचे कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विरोधक केंद्रातील सरकारला विविध मुद्द्यांवरुन कोंडीत पकडणार आहे. मणिपूर हिंसा, दिल्ली सेवा अध्यादेशावरुन विरोधक मोदी सरकारला धारेवर धरणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीच्या 'इंडिया'च्या नेत्यांची संसद भवनाच्या सभागृहात बैठक होणार आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 20, 2023, 10:27 AM IST

Updated : Jul 20, 2023, 3:01 PM IST

नवी दिल्ली: संसदेच्या मान्सून आजपासून सुरू होत आहे. परंतु पहिलाच दिवस दोन्ही सभागृहासाठी वादाचा ठरला असून दोन्ही सभागृहातील कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 12 वाजपर्यंत तहकूब करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. परंतु काही वेळात दोन्ह सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले, की संसदेतील सर्व सहकारी सहकार्य करतील अशा विश्वास आहे. कायदे करणे व त्यांचा विस्तार करणे ही संसद व खासदार यांची जबाबदारी आहे. जनतेच्या हितासाठी विधेयक सादर करण्यात येणार आहे. खासदारांनी संसदेत मिळणाऱ्या वेळेचा चांगला उपयोग करावा. वाद हे चर्चेने सोडविण्याची परंपरा आहे. मणिपूरमधील घटनेने खूप दु:ख झाले आहे. ह्रदयात खूप क्रोध आहे. मणिपूरमधील घटना ही अत्यंत लाजिरवाणी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

  • #WATCH | Congress President Mallikarjun Kharge says, "Today we are raising the issue (of Manipur in Parliament). I have also given notice. We will see whether our Chairman (Rajya Sabha) will allow us to raise it or not. PM is silent on this. You have time to call 38 parties (for… pic.twitter.com/E33PmioYA1

    — ANI (@ANI) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #WATCH | Congress MP Gaurav Gogoi says, "The visuals from Manipur that we saw yesterday have left us shocked. I think, first of all, the PM should come to the House and make a statement on Manipur and appeal for peace. PM Modi should apologise to the people of Manipur today for… pic.twitter.com/r64zKZsQoQ

अधिवेशनाच्या सत्रात विरोधी पक्ष मणिपूरची परिस्थिती आणि दिल्ली प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला कोंडीत पकडणार आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) पराभव करण्यासाठी 26 विरोधी पक्षांनी एक दिवस अगोदर भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (INDIA) ची स्थापना केली आहे. आज पावसाळी अधिवेशन 2023 सुरू होत आहे, यामुळे विरोधी पक्ष एनडीएला कोंडीत पकडणार असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधी पक्ष मोदी सरकारला घेरणार : विरोधी पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरणार आहे. ईशान्येकडील मणिपूर राज्यात 3 मेपासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसदेच्या या अधिवेशनादरम्यान दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश आणि त्याच्याशी संबंधित विधेयकाचा मुद्दा देखील उपस्थित केला जाणार आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) दिल्लीतील नोकरशहांच्या नियुक्ती आणि बदलीशी संबंधित या अध्यादेशाला विरोध करत आहे. हे अध्यादेश केंद्र सरकारने मे महिन्यात जारी केला होते.

  • #WATCH | Rajya Sabha MP Kapil Sibal says, "We should hang our heads in shame that this is happening in our country. Today, after the remarks of the Supreme Court, the PM gave a statement. Why is the Home Minister silent? What happened to 'Beti Padhao Beti Bachao'? Will you save… pic.twitter.com/qzcWL6aj0X

2023 च्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाल्यानंतर आप नेते संजय सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संविधान दुरुस्तीचा विषय अध्यादेशाद्वारे कसा मंजूर केला जाऊ शकतो? दिल्लीतील दोन कोटी जनतेचे हक्क दाबणे आणि केजरीवाल सरकारला काम न करू न देण्याच्या भूमिकेचा आम्ही विरोध करू. सर्वोच्च न्यायालयाने पास केलेला अध्यादेश मोडून नवीन नियम लागू करणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करू. सिंग म्हणाले की, संघराज्य रचनेला चिरडण्यासाठी अशा प्रकारे अध्यादेश आणणे 'लज्जास्पद' आहे. - आप नेते संजय सिंह.

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि डीन कुरिओकोस, डीएमकेचे ए राजा, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन यांनी लोकसभेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश 2023 रद्द करण्याची नोटीस दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनीही मणिपूरमधील परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरकारशी चर्चेची मागणी केली.

हेही वाचा -

  1. BJP MLA Suspended : विधानसभेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी भाजपचे 10 आमदार निलंबित
  2. Dr Sujay Vikhe Patil: संसदेत पहिल्या टर्मच्या उत्कृष्ट १० खासदारांमध्ये डॉ. सुजय विखे पाटील

Last Updated : Jul 20, 2023, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.