ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरु

अदानी वादावरून झालेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले होते. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीची चौकशी संयुक्त संसदीय समितीद्वारे करण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. आता पुन्हा कामकाज सुरु झाले आहे.

Parliament
Parliament
author img

By

Published : Feb 7, 2023, 11:20 AM IST

Updated : Feb 7, 2023, 2:54 PM IST

नवी दिल्ली : अदानी वादावर चर्चेची आणि जेपीसीच्या मागणीवरून विरोधी खासदारांनी आज संसदेत गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आता पुन्हा कामकाज सुरु झाले आहे.सभागृहातील गदारोळामुळे आजही झिरो अवर होऊ शकला नाही. बैठकीच्या सुरुवातीला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सोमवारी सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपाचा संदर्भ देत म्हटले की, या आपत्तीमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे.

भारताने तुर्कीला मदत पाठवली : ते म्हणाले की, विविध देश सीरिया आणि तुर्कीला मदत पाठवत आहेत. भारतानेही औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मदत पाठवली आहे. ते म्हणाले की, संकटाच्या या काळात भारताने दोन्ही देशांप्रती एकता दाखवली आहे. यानंतर भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ सदनात काही क्षण मौन पाळण्यात आले. त्यानंतर सभापतींनी आवश्यक ती कागदपत्रे सभागृहाच्या टेबलावर ठेवली. त्यांनी सभागृहाला सांगितले की त्यांना काँग्रेस, डावे पक्ष, बीआरएससह विविध पक्षांकडून 30 नोटिसा मिळाल्या आहेत ज्यात नियम 267 अन्वये कामकाज स्थगित करत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

कामकाज स्थगित : ते पुढे म्हणाले की, सदस्य झिरो अवर आणि नंतर इतर माध्यमातून आपले मुद्दे मांडू शकतात. सभापतींनी असे सांगताच विरोधी सदस्यांनी त्याला विरोध केला आणि सदनात गदारोळ सुरू झाला. सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करत धनखड म्हणाले की, सभागृहात सुव्यवस्था असावी, चर्चा व्हायला हवी, गोंधळ नको. प्रत्येक वेळी या गोष्टींची पुनरावृत्ती होते, मात्र त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गोंधळ न थांबल्याने त्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले.

संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशीची मागणी : संसदेच्या अधिवेशनापूर्वी आजच्या दिवसाची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी सकाळी विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, बहुतांश विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि ते अदानीच्या स्कॅमची चौकशी संयुक्त संसदीय समिती द्वारे व्हावी, या मागणीवर ठाम आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसी आणि एसबीआयने यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे हे प्रकरण प्रत्यक्षात सामान्य लोकांच्या पैशांचा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा : Turkey Earthquake Today : भूकंपाच्या आणखी एका धक्याने हादरले तुर्की, मदत आणि बचावकार्य जारी

Last Updated : Feb 7, 2023, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.