ETV Bharat / bharat

Pandit Birju Maharaj : कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराजांचे हृदय विकाराने निधन

पद्मविभूषण आणि प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराने दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. उत्तम कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते.

Pandit Birju Maharaj
पंडीत बिरजू महाराज
author img

By

Published : Jan 17, 2022, 7:16 AM IST

Updated : Jan 17, 2022, 9:14 AM IST

नवी दिल्ली - पद्मविभूषण आणि प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराने दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. उत्तम कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाची डॉक्टरेट

बिरजू महाराज यांचा नातू स्वरांश मिश्रा याने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यासोबतच गायक अदनान सामीनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान सामीने सोशल मीडियावर लिहिले- 'महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज जी यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी व्यक्ती गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. दरम्यान, कथ्थकवरील बिरजू महाराजांची भक्ती पाहता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे.

पंडित बिरजू महाराज हे एक प्रभावी कलात्मक व्यक्तिमत्व

पंडित बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा नातू स्वरांश मिश्रा याने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पंडित बिरजू महाराज हे एक प्रभावी कलात्मक व्यक्तिमत्व होते जे नेहमी तर्काच्या पलीकडे राहिले. ते गुरू, नर्तक, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार देखील होते. याशिवाय ते तालवाद्यही वाजवत असत. यासोबतच त्यांना कविता लिहिण्याची आणि चित्रे काढण्याचीही आवड होती.

चित्रपटातील नृत्य कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित

बिरजू महाराज यांना पद्मविभूषण या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी उमराव जान, बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले. पद्मविभूषण व्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला. त्याचवेळी, 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कालिका-बिंदादिन घराण्याचे ते प्रमुख नर्तक

बीरजू महाराज यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. पं.बिरजू महाराज यांनी आपल्या कला आणि प्रतिभेने जगभरात देशाचा आणि राज्याचा गौरव केला. शास्त्रीय कथ्थक नृत्यातील लखनौ कालिका-बिंदादिन घराण्याचे ते प्रमुख नर्तक होते. अशा शब्दांद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

जगात देशाचा आणि राज्याचा गौरव केला

यासोबतच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पं. बिरजू महाराज यांनी आपल्या कला आणि प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण जगात देशाचा आणि राज्याचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वाची झालेली हानी भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करून राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

हेही वाचा - लसीकरण मोहिमेला एक वर्ष! 92 टक्के लोकांचा पहिला डोस पुर्ण

Last Updated : Jan 17, 2022, 9:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.