ETV Bharat / bharat

Imran Khan loses PM : इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार! अविश्वास ठरावात पराभव - Defeat of Imran Khan in no-confidence motion

पाकिस्तानमध्ये सुरू असलेली राजकीय अस्थिरता अखेर संपली. पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वास ठराव गमावल्याने त्यांचे सरकार पडले आहे. (Imran Khan loses PM Post) पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार
इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार
author img

By

Published : Apr 10, 2022, 9:30 AM IST

Updated : Apr 10, 2022, 9:36 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी आघाडीने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव रविवारी पहाटे यशस्वी झाला. त्यामध्ये नॅशनल असेंब्लीच्या बहुसंख्य सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. (Pakistan's national assembly) नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. (Defeat of Imran Khan in no-confidence motion) अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. आता इम्रान खान यांचे सरकार पडल्यावर पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होणार आहेत. पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

  • 174 members have recorded their votes in favour of the resolution. The no-confidence motion against Prime Minister Imran Khan has been passed in the Pakistan National Assembly. pic.twitter.com/wwZoZcwS9A

    — ANI (@ANI) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान इम्रान खानविरोधात अविश्वास प्रस्ताव - पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये 172 बहुमत आहेथ. पीटीआयच्या नेतृत्वाखालील युती 179 सदस्यांच्या पाठिंब्याने तयार झाली होती, (Pakistan's Prime Minister Imran Khan) ज्यामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य होते. पीटीआयने आपला प्रमुख सहयोगी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) गमावल्यानंतर आणि विरोधी पक्षाने 8 मार्च रोजी पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खानला मोठा धक्का बसला होता.

अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश - नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने पाकिस्तान सरकार पाडण्याच्या कटात परदेशी हात असल्याचे सांगत (3 एप्रिल)रोजी अविश्वास प्रस्ताव नाकारला होता. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हा देण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उपसभापतींची ही कृती देशाच्या संविधानाचे उल्लंघन असल्याचे घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्लीला शनिवारी सभागृहाचे अधिवेशन बोलावून अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर हे मतदान पार पडले. त्यामध्ये इम्रान खान यांनी बहुमत गमावले.

मध्यरात्री इम्रान खान पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले - यानंतर आता संविधानिक प्रक्रिया आणि नियमांनुसार, सभागृह अविश्वास प्रस्तावाचा निकाल राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असून नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. मात्र, अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवलेले इम्रान खान हे पहिले नेते आहेत. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री इम्रान मतदानापूर्वीच पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.

मतदानापूर्वी सभापतींनी दिला राजीनामा - इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच सभापतींनी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी दुसरा नेता स्पीकरच्या खुर्चीवर बसला. याआधी पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मतदान झाले, ज्यामध्ये इम्रान सरकारचा पराभव झाला आहे.

पाकिस्तानसाठी दुःखद दिवस -फवाद चौधरी - इम्रान खान यांच्या सरकारच्या पडझडीवर पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस पाकिस्तानसाठी दुःखाचा दिवस होता. ते म्हणाले की, लुटेरे परत आले आहेत. फवाद चौधरी म्हणाले की, अलीकडेच पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानातून निरोप देण्यात आला आहे. मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे आणि त्याच्यासारखा नेता मिळाल्याचा आनंद आहे.

नवी पहाट सुरू झाली - शाहबाज शरीफ - पाकिस्तानचे पुढचे संभाव्य पंतप्रधान शाहबाज शरीफ इम्रान सरकार पडल्याबद्दल सभागृहात बोलताना म्हणाले की, नेत्यांना पाकिस्तानात तुरुंगात कसे पाठवले गेले, आम्हाला त्यात पडायचे नाही. आम्हाला पाकिस्तानला चांगले बनवायचे आहे. मला असे म्हणायचे आहे की, आम्हाला या देशाच्या जखमा भरायच्या आहेत. आम्ही कोणाचाही बदला घेणार नाही. आम्ही कुणालाही तुरुंगात पाठवणार नाही, पण कायदा स्वत:चा मार्ग स्वीकारेल. न्यायाचा विजय होईल. आपण मिळून हा देश चालवू आणि पाकिस्तानला कायदे आझमचा पाकिस्तान बनवू.

हेही वाचा - शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलनापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी केली रेकी; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज

Last Updated : Apr 10, 2022, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.