ETV Bharat / bharat

Pakistani woman arrested: एलओसी ओलांडणाऱ्या पाकिस्तानी महिलेला पूंछमध्ये अटक - Interrogation By Army

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात एका पाकिस्तानी महिलेला अटक ( Pakistani woman arrested ) करण्यात आली आहे. नियंत्रण रेषा ओलांडून भारतात ती महिला आली होती. रोझिना (४९) असे महिलेचे नाव आहे

Pakistani woman arrested
पाकिस्तानी महिलेला अटक
author img

By

Published : Jul 16, 2022, 4:35 PM IST

जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लष्कराने शुक्रवारी रात्री एका पाकिस्तानी महिलेला अटक ( Pakistani woman arrested ) केली. ही महिला नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आली ( Women Crossed LOC )होती. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रोझिना (४९) ( Rozina ) असे महिलेचे नाव आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या फिरोजबांदा भागातील ती रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रोझिनाने पूंछमधील चक्र दा बाग येथे नियंत्रण रेषा ओलांडली.

लष्कराकडून त्यांची चौकशी - महिलेला अटक करण्यात आली असून लष्कर तिची चौकशी ( Interrogation By Army ) करत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, जम्मू आणि काश्मीरमध्ये, भारतीय लष्कराने घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी 1999 साली लष्कराने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर फेंसिंग लावण्यास सुरुवात केली होती.

सीसीटीव्ही, सेन्सरच्या माध्यमातून नजर - फेंसिंग लावल्यामुळे घुसखोरी आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली आहे. तरीही सीसीटीव्ही आणि तारांसह तैनात थर्मल सेन्सर्सचा वापर यासारख्या तांत्रिक हस्तक्षेपांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यात मदत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह सेक्टरमध्ये लष्कराने शम्सबारी रेंजमध्ये नियंत्रण रेषेजवळ काटेरी तारांच्या कुंपणासह सीसीटीव्ही कॅमेरे आणि थर्मल सेन्सर बसवले आहेत. जे या भागातील घुसखोरीवर बारीक नजर ठेवतात. केरन सेक्टरमध्ये 55 किमी लांबीच्या नियंत्रण रेषेवर 268 इन्फंट्री ब्रिगेडच्या तुकड्या पाळत ठेवत आहेत. त्याचे मुख्यालय केरन गावापासून ४० किमी पुढे फारकियान येथे आहे. लष्कराने मुख्यालयात आधूनिक नियंत्रण कक्ष उभारला असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेन्सर फुटेजच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.

हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.