श्रीगंगानगर: भारत-पाक सीमेवर (Try to infiltrate into India) पाकिस्तानच्या कुरघोड्या (Pakistani infiltrator shot dead ) काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तान सतत भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो तर कधी ड्रोनद्वारे अंमली पदार्थ पाठवतो. काल रात्री राजस्थानमधील अनुपगडजवळ बीएसएफच्या जवानांनी (BSF shooted Pakstani infiltrator) एका पाकिस्तानी घुसखोराला ठार (BSF killed Pakstani infiltrator) मारले. (latest news from Rajsthan)
पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून संपविले- मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अनुपगडच्या शेरपूर पोस्टजवळ बीएसएफच्या जवानांनी (Sherpur Post of Anupgarh) एका पाकिस्तानी व्यक्तीला येताना पाहिले. यानंतर सैनिकांनी त्याला आव्हान दिले आणि तो लपण्याचा प्रयत्न करू लागला. अशा स्थितीत बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून त्याला ठार केले.
बीएसएफ अधिकारी घटनास्थळी दाखल- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पाकिस्तानी नागरिक भारतीय हद्दीत खूप आत शिरला होता. सुरुवातीच्या कारवाईनंतर बीएसएफने घुसखोराचा मृतदेह अनुपगड पोलिसांच्या ताब्यात दिला. जो पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.