ETV Bharat / bharat

Pakistan Flag In Bihar : पूर्णियात पाकिस्तानी ध्वज फडकवल्याचा दावा खोटा ठरला, कोणी पसरवली अफवा? - turned out to be false

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पाकिस्तानी ध्वज फडकल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्णिया जिल्ह्यातील मधुबनी टॉप पोलिस स्टेशनच्या शास्त्री नगरच्या छोट्या मशिदीजवळील घरावर हा ध्वज फडकवल्याची बातमी आहे. जरी हा धार्मिक ध्वज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशी अफवा कोणी पसरवली यावर सध्या चर्चा होत आहे

Pakistan Flag In Bihar
प्रजासत्ताक दिनी फडकावला पाकिस्तानचा झेंडा
author img

By

Published : Jan 27, 2023, 7:14 AM IST

Updated : Jan 28, 2023, 6:20 PM IST

प्रजासत्ताक दिनी फडकावला पाकिस्तानचा झेंडा

पूर्णिया : बिहारच्या पूर्णियामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरालगतच्या मधुबनी सिपाही टोला परिसरात पाकिस्तानी ध्वज फडकवल्याचा दावा करण्यात आला. मशिदीला लागून असलेल्या एका घरात पाकिस्तानी ध्वज फडकताना दिसला. हे प्रकरण मधुबनी टॉप पोलिस स्टेशन परिसरात आहे. पोलिस दलासह मीडिया टीम घटनास्थळी पोहोचली, त्यानंतर पोलिसांनी घरावरील ध्वज हटवला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनात खळबळ उडाली.

दावा खोटा ठरला : ज्याला पाकिस्तानी ध्वज म्हटले जात आहे तो प्रत्यक्षात धार्मिक ध्वज असल्याचेही पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. पूर्णिया पोलिसांनी ट्विट करत सांगितलेकी, २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मधुबनी टॉप परिसरातील सिपाही टोला येथे एक व्यक्ती आपल्या छतावर दुसऱ्या देशाचा ध्वज फडकवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर माहितीची पडताळणी करण्यात आली. तपासात असे आढळून आले की, हा ध्वज धार्मिक ध्वज आहे, जो जवळपास एक महिन्यापासून तिथे बसवला होता.

पाकिस्तानी ध्वज असल्याचा दावा : यापूर्वी ज्या घरावर हा झेंडा फडकवला होता, त्या घराच्या मालकाचे नाव मो. मुबारुकदी आहे. त्या घरातील महिला सदस्याने सांगितले की, हा पाकिस्तानचा ध्वज आहे हे मला माहीत नाही. हा ध्वज आज सकाळी त्यांच्या नात्यातील एका मुलाने फडकवला. ते त्याला धार्मिक ध्वज म्हणत आहेत. जर असे असेल तर ते चुकीचे आहे, असे त्या महिलेने मान्य केले. मो. मुबारुकदी शहरातील माधोपाडा भागात एक खाजगी शाळा चालवतात. तिच्या पतीला दोन भाऊ असून दोन्ही भाऊ एकाच घरात राहतात.

पोलीस तपास करत आहेत: या संदर्भात मधुबनी टॉप पोलीस स्टेशनचे स्टेशन हेड पवन कुमार चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच ते संशयिताच्या घरी पोहोचले. ध्वज काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसडीओ पूर्णिया यांच्याशी चर्चा झाली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या हा झेंडा पाकिस्तानी आहे की नाही, याचा तपास सुरू आहे. घरात हा झेंडा कुठून आला आणि तो लावण्यामागचा हेतू काय होता, याचाही तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो. ध्वज काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसडीओ पूर्णिया यांच्याशी चर्चा झाली आहे. एसडीओ यांना कळविण्यात आले आहे. आता त्यांच्याकडेच चर्चेसाठी जात आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार कारवाई केली जाईल. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही' - पवनकुमार चौधरी, पोलीस ठाणे प्रमुख

हेही वाचा : Allah Hu Akbar Slogans In AMU : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात 'अल्ला हू अकबर'चे नारे; अलिगड विद्यापीठातील घटना

Last Updated : Jan 28, 2023, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.