चंदीगड : पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने ( BSF in Firozpur sector Punjab ) आज पाकिस्तानचे ड्रोन पाडले. ( Pakistani Drone Shot Down ) याआधी बुधवारी अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानच्या बाजूने घुसलेले ड्रोन पाडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना ( BSF in Firozpur sector ) पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानकडून एक ड्रोन येताना दिसला. ज्यावर त्याने गोळ्या झाडल्या. आता बीएसएफकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. ( Pakistani Drone Shot down by BSF in Firozpur )
-
Punjab | On 21 Dec at about 8pm, BSF troops detected drone intrusion from Pakistan in AOR of BOP Harbhajan, 101 BN, Ferozepur Sector, Tarn Taran, following which they fired heavily on it. Today morning, troops recovered the drone in farm 3. Further search in progress: BSF pic.twitter.com/mvdPb6n7jf
— ANI (@ANI) December 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Punjab | On 21 Dec at about 8pm, BSF troops detected drone intrusion from Pakistan in AOR of BOP Harbhajan, 101 BN, Ferozepur Sector, Tarn Taran, following which they fired heavily on it. Today morning, troops recovered the drone in farm 3. Further search in progress: BSF pic.twitter.com/mvdPb6n7jf
— ANI (@ANI) December 22, 2022Punjab | On 21 Dec at about 8pm, BSF troops detected drone intrusion from Pakistan in AOR of BOP Harbhajan, 101 BN, Ferozepur Sector, Tarn Taran, following which they fired heavily on it. Today morning, troops recovered the drone in farm 3. Further search in progress: BSF pic.twitter.com/mvdPb6n7jf
— ANI (@ANI) December 22, 2022
सीमेवर ड्रोन पाडला : गेल्या महिन्यात सीमा सुरक्षा दलाच्या महिला पथकाने पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानमधून सीमेवर घुसलेले ३.१ किलो अमली पदार्थ वाहून नेणारा ड्रोन पाडला आणि सीमापार अंमली पदार्थांच्या तस्करीचा कट उधळून लावला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफच्या जवानांनी रात्रीच्या वेळी अमृतसर शहराच्या उत्तरेला सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या चहारपूर गावाजवळ ड्रोन भारतीय हद्दीत प्रवेश करताना पाहिले.
ड्रोनमध्ये अमली पदार्थ : 73 बटालियनच्या दोन महिला कॉन्स्टेबलने ड्रोनवर 25 गोळ्या झाडल्या आणि रात्री 11.55 वाजता ड्रोन पाडला. शोध मोहिमेदरम्यान बीएसएफला सहा रोटर असलेले मानवरहित हवाई वाहन 'हेक्साकॉप्टर' अर्धवट खराब झालेल्या अवस्थेत सापडले. 18 किलो वजनाच्या ड्रोनमध्ये 3.11 किलो अमली पदार्थ ठेवण्यात आले होते, जे त्याखाली एका पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.