ETV Bharat / bharat

Pakistani Citizen Arrested : घुसखोरी करून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला भारत- पाकिस्तान सीमेजवळ अटक

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ( India Pakistan International Border ) बीएसएफने एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली ( Bsf arrest one pakistani citizen ) आहे. पाकिस्तानी नागरिकाची चौकशी केल्यानंतर बीएसएफने त्याला पोलिसांच्या ताब्यात ( Pakistani citizen arrested at Sriganganagar border ) दिले.

Pakistani Citizen Arrested
घुसखोरी करून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला भारत- पाकिस्तान सीमेजवळ अटक
author img

By

Published : Jul 17, 2022, 6:38 PM IST

श्रीगंगानगर ( राजस्थान ) : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ( India Pakistan International Border ) पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसखोरीचा नापाक प्रयत्न केला ( Bsf arrest one pakistani citizen ) आहे. जिल्ह्यातील हिंदुमलकोट सीमेवर बीएसएफने एका पाकिस्तानी नागरिकाला घुसखोरीच्या प्रयत्नात पकडले ( Pakistani citizen arrested at Sriganganagar border ) आहे. रविवारी सकाळी तरबंडीजवळ भारतीय सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानकडून आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफने घेरले. कर्तव्यावर असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले आणि त्याचा शोध घेतला. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडून अद्याप काहीही मिळालेले नाही. त्याचवेळी बीएसएफने हिंदुमलकोट पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. आपली कारवाई पूर्ण करून बीएसएफ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी घुसखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अन् घेतले ताब्यात : घुसखोराला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस आणि विविध यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जात आहे. पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, बीएसएफने पोलिसांना कळवले की ते आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिंदुमलकोट भागात सीमेवर पाळत ठेवत आहेत, तेव्हा रविवारी सकाळी पाकिस्तानच्या बाजूने एक व्यक्ती भारतीय सीमेकडे दिसली. पाकिस्तानी नागरिक शून्य रेषा ओलांडून वायरबंदीपर्यंत पोहोचला होता. यावर सुरक्षेत तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र त्याने न पाळता घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला घेराव घातला. चौकशीनंतर पाकिस्तानी घुसखोराला हिंदुमलकोट पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तपास सुरु : बीएसएफने दिलेल्या अहवालावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. भारतीय हद्दीत घुसण्याचा त्याचा हेतू जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर बीएसएफच्या जवानांनी सीमेवर पाळत वाढवली आहे. हिंदूमलकोट पोलिस स्टेशनने सांगितले की, या संदर्भात बीएसएफने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संयुक्त चौकशी केली जात असून, जेआयसीसाठी श्रीगंगानगर येथे नेण्यात येणार आहे.

हेही वाचा : Pakistani Bully Dog Attacked : पाकिस्तानी शिकारी कुत्र्याचा भारताच्या निवृत्त कर्नलवर हल्ला.. जोराने घेतला चावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.