ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन जवान हुतात्मा - ceasefire violation by pak

'राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शुक्रवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात नायक प्रेम बहादूर खत्री आणि रायफलमन सुखबीर सिंग गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर दोन्ही जखमी सैनिकांनी अखेरचा श्वास घेतला,' अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली. तर, गुरुवारी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुभेदार (जेसीओ) स्वतंत्र सिंह यांचाही शुक्रवारी मृत्यू झाला, असे देवेंद्र आनंद यांनी सांगितले.

पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन न्यूज
पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन न्यूज
author img

By

Published : Nov 27, 2020, 6:13 PM IST

जम्मू - जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धविराम उल्लंघनात तीन भारतीय जवान हुतात्मा झाले. अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

'राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शुक्रवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात नायक प्रेम बहादूर खत्री आणि रायफलमन सुखबीर सिंग गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर दोन्ही जखमी सैनिकांनी अखेरचा श्वास घेतला,' अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचा इतिहास

दरम्यान, गुरुवारी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुभेदार (जेसीओ) स्वतंत्र सिंह यांचाही शुक्रवारी मृत्यू झाला, असे देवेंद्र आनंद यांनी सांगितले.

'सुभेदार स्वतंत्र सिंह, नायक प्रेम बहादूर खत्री आणि रायफलमन सुखबीरसिंग हे देशाला वाहून घेतलेले आणि प्रेरणादायी सैनिक होते. सर्वोच्च बलिदान आणि कर्तव्यनिष्ठा यासाठी देश त्यांचा नेहमीच ऋणी असेल,' असे ते पुढे म्हणाले.

या दोन्ही ठिकाणी भारतीय सैन्याने शत्रूंच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा - प्रवासी गाढ झोपेत असताना 'हाय व्होल्टेज' तारेला बसचा स्पर्श

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.