ETV Bharat / bharat

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची दिल्लीकडे कूच, म्हणाले... - आत्महत्याग्रस्त शेतकरी मराठवाडा

सुमारे ३५ आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि मुले दिल्लीकडे कूच करत असून राजस्थानात पोहचले आहेत. जयपूर येथील धोबी घाट परिसरात हे सर्वजण पोहचले असून गुरुद्वाऱ्यात त्यांनी जेवण घेतल्यानंतर पुन्हा दिल्लीची वाट धरली.

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचीही दिल्लीकडे कूच, कवितेतून मांडल्या व्यथा

author img

By

Published : Jan 7, 2021, 11:03 AM IST

जयपूर - दिल्लीमध्ये 43 दिवसांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातूनही अनेकजण जात आहेत. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लहान मुले आणि महिला या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत.

राजस्थानातील धोबी घाट परिसरात थांबा -

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचीही दिल्लीकडे कूच, कवितेतून मांडल्या व्यथा

सुमारे ३५ आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि मुले दिल्लीकडे कूच करत असून राजस्थानात पोहचले आहेत. जयपूर येथील धोबी घाट परिसरात हे सर्वजण पोहचले असून गुरुद्वाऱ्यात त्यांनी जेवण घेतल्यानंतर पुन्हा दिल्लीची वाट धरली. या महिलांनी मुलांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे दु:ख काय असते, हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी चाललेल्या लहानग्या मुलांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे मांडले दु:ख -

शेतकऱ्यांनी कधीही विष खाऊन आत्महत्या करू नये. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची दयनीय अवस्था होते. कुटुंबाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. देशातील एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, अशा भावना या सर्व आंदोलकांनी व्यक्त केल्या. मोदी सरकारने पास केलेले कायदे शेतकरीविरोधी असून त्याचा विरोध करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जवानांसारखा शेतकरीही शहीद होतो -

आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सरकारने पुनर्वसन करावे. त्यांनाही चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा अधिकार आहे. ज्या प्रकारे जवान सीमेवर शहीद होतो त्याप्रमाणे शेतकरी शेतात काम करताना शहीद होतो. वैष्णवी परमेश्वर नावाच्या मुलीने कवितेतून आपल्या वडीलांच्या आत्महत्येचे दु:ख व्यक्त केले. पाणी पिऊन दिवाळी साजरी करू, मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, या तिच्या कवितेने मन गहीवरते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.