कानपूर - शहरातील पनकी पोलीस स्टेशन हद्दीत आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट झाला आहे. अॉक्सिजन रिफिलिंग करतांना सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका मजूराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत.
मजूराचा मृत्यू
ज्या परिसरात ही घटना घटली आहे. तो परिसर कारखान्याचा भाग आहे. याठिकाणी अॉक्सिजन सिलिंडर भरण्याचे काम केल्या जाते.अॉक्सिजन सिलिंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. आजही (शुक्रवारी) अॉक्सिजन सिलिंडर भरूण घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग पहायला मिळाली. याच वेळी सिलिंडर भरतांना स्फोट झाला आणि या स्फोटात एका मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौकशीला सुरूवात केली आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.