ETV Bharat / bharat

देशामध्ये ९ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सपोर्ट-आरोग्य मंत्रालय - Group of Ministers meeting on covid situation

देशामध्ये 4,88,861 रुग्णांना आयसीयू बेडची गरज होती, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रिगटाची आज 25 वी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

आरोग्य मंत्री
आरोग्य मंत्री
author img

By

Published : May 8, 2021, 10:49 PM IST

नवी दिल्ली - देशात 1,70,841 रुग्णांना व्हेटिंलेटरची गरज आहे. तर 9,02,291 जणांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.

देशामध्ये 4,88,861 रुग्णांना आयसीयू बेडची गरज होती, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रिगटाची आज 25 वी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

हेही वाचा-डीआरडीओकडून कोरोनाच्या लढ्याकरिता औषध विकसित; डीजीसीआयकडून मंजुरी

बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप एस. पुरी, केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे उपस्थित होते. तर अश्विनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल हे ऑनलाईन उपस्थित होते.

हेही वाचा-हैदराबादपाठोपाठ उत्तर प्रदेशमधील दोन सिंहिणींना कोरोनाची लागण

ऑक्सिजनचे उत्पादन वाढले-

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ऑक्सिजनचे उत्पादन रोज 9,400 मेट्रिक टनपर्यंत वाढविले आहे. तर पीएम केअर्स फंड, डीआरडीओ आणि सीएसआयआरच्या मदतीने ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला टास्क फोर्स नेमण्याचे आदेश-

देशातील सर्व राज्यांमध्ये ऑक्सिजनचे सुरळित वितरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. ऑक्सिजनच्या वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्सच्या निर्मितीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राज्यांना असणारी ऑक्सिजनची गरज व पुरवठा यांचे मुल्यांकन करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.