ETV Bharat / bharat

काय? चांगल्या करीअरसाठी जवानांचा निमलष्करी दलाला बाय बाय? दहा वर्षांत 81 हजार जवानांची स्वेच्छा निवृत्ती

सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स या निमलष्करी दलातील 81007 जवानांनी 2011 ते 2020 या कालावधीत स्वेच्छा निवृत्ती घेतली असून 15904 जवानांनी राजीनामी दिल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

काय? चांगल्या करीअरसाठी जवानांचा निमलष्करी दलाला बाय बाय? दहा वर्षांत 81 हजार जवानांची स्वेच्छा निवृत्ती
काय? चांगल्या करीअरसाठी जवानांचा निमलष्करी दलाला बाय बाय? दहा वर्षांत 81 हजार जवानांची स्वेच्छा निवृत्ती
author img

By

Published : Jul 16, 2021, 4:03 PM IST

नवी दिल्ली : 2011 ते 2020 या दहा वर्षांच्या कालावधीत देशातील सहा निमलष्करी दलातील 81 हजारहून अधिक जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. याच कालावधीत सुमारे 16 हजार जवानांनी राजीनामा दिल्याचेही मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कौटुंबिक तसेच आरोग्याची कारणे तसेच करीअरच्या चांगल्या संधी मिळाल्याची कारणे यामागे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहा वर्षांत 81 हजार जवानांची स्वेच्छा निवृत्ती

सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स या निमलष्करी दलातील 81007 जवानांनी 2011 ते 2020 या कालावधीत स्वेच्छा निवृत्ती घेतली असून 15904 जवानांनी राजीनामी दिल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 2013 मध्ये सर्वाधिक 2332 जवानांनी राजीनामा दिल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

चांगले करीअर, कुटुंबासाठी निमलष्करी दलातून बाहेर?

निमलष्करी दलातून स्वेच्छा निवृत्ती घेण्यामागे तसेच राजीनामा देण्यामागे वैयक्तिक व कौटुंबिक कारणांसह आरोग्य आणि करीअरच्या चांगल्या संधी अशी कारणे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, देशातील सहा निमलष्करी दलात सुमारे 10 लाख जवान कार्यरत आहेत.

बीएसएफमधून सर्वाधिक जवानांची स्वेच्छा निवृत्ती

या कालावधीत बीएसएफमधून सर्वाधिक 36768 जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याखालोखाल सीआरपीएफमधून 26164, सीआयएसएफमधून 6705, आसाम रायफल्समधून 4947, एसएसबीमधून 3230 आणि आयटीबीपीमधून 3193 जवानांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी 2017 मध्ये सर्वाधिक 11728 जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर 2011 मध्ये सर्वाधिक 11260 जवानांनी, 2012 मध्ये 10859, 2013 मध्ये 9355, 2016 मध्ये 6981, 2014 मध्ये 5931, 2015 मध्ये 1686 जणांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.

सीआयएसएफमधून सर्वाधिक राजीनामे

तर याच कालावधीत राजीनामा देणाऱ्यांमध्ये सीआयएसएफमधील सर्वाधिक 5848 जवानांचा समावेश आहे. त्यानंतर बीएसएफमधील 3837, सीआरपीएफमधील 3366, आयटीबीपीमधील 1648, एसएसबीमधील 1031 आणि आसाम रायफल्समधील 174 जवानांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा - VIDEO : पाहा, तालिबानविषयी प्रश्न विचारताच कसे पळाले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.