ETV Bharat / bharat

Indian Prisoners In Foreign Jails: परदेशातील तुरुंगांमध्ये 56% पेक्षा जास्त भारतीय कैदी आखाती देशांमध्ये ;लोकसभेत माहिती उघड - परदेशातील तुरुंगांमध्ये कैदी

परदेशात बंद असलेल्या भारतीय कैद्यांची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 8,437 भारतीय कैदी परदेशात बंद आहेत.

Indian Prisoners In Foreign Jails
Indian Prisoners In Foreign Jails
author img

By

Published : Mar 25, 2023, 5:31 PM IST

नवी दिल्ली: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी सांगितले की, 8,437 भारतीय कैदी, ज्यात अंडरट्रायल देखील आहेत. हे सर्व जगभरातील विविध तुरुंगांमध्ये बंद आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) खासदार डॉ. एम. पी. अब्दुसमद यांनी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अंडरट्रायल आणि स्थलांतरित दोषींच्या तपशिलाबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या लेखी प्रतिक्रियेच्या स्वरूपात ही माहिती समोर आली आहे. यामध्ये इतर देशांत असलेल्या कैद्यांसंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Love Jihad : मध्यप्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर लव्ह जिहाद प्रकरणे तपासणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

आखाती देशांमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांची संख्या सुमारे ४,७९५ : एमओएसने शेअर केलेल्या माहितीनुसार, जगभरातील विविध तुरुंगांमध्ये अंडरट्रायलसह एकूण 8,437 भारतीय कैदी बंद आहेत. यातील बहुतांश भारतीय कैदी आखाती देशांमध्ये बंदिस्त आहेत. आखाती देशांमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांची संख्या सुमारे ४,७९५ आहे.

MoS ने दिलेल्या तपशिलानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 1,966, सौदी अरेबियामध्ये 1,362, कतारमध्ये 682, कुवेतमध्ये 428, बहरीनमध्ये 265 आणि ओमानमध्ये 92 भारतीय कैदी आहेत. हे सर्व देश गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचे (GCC) सदस्य आहेत. याशिवाय शेजारच्या नेपाळमध्ये 1,222 भारतीय कैदी, मलेशियामध्ये 606, युनायटेड किंगडममध्ये (यूके) 237 भारतीय कैदी आहेत. अमेरिकेत 294, पाकिस्तानात 51, चीनमध्ये 170 कैदी आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांवर ठपका? हक्कभंग समितीचा अहवाल राज्यसभेकडे जाणार; उपसभापतींची माहिती

तुरुंगात टाकल्याच्या घटनांवर बारकाईने लक्ष : परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, 'परदेशातील तुरुंगात बंदिस्त भारतीयांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे'. दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, 'परदेशातील भारतीय मिशन/पोस्ट सतर्क आहेत. भारतीय नागरिकांना तुरुंगात टाकल्याच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द; प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.