नवी दिल्ली - जगभरातील ५० हून अधिक देशांनी कोविनच्या यंत्रणेत तयारी दाखविल्याची आहे. ही माहिती भारत ओपन सोर्स सॉफ्टवेअरमधून मोफत देणार आहे. ते सीसीआयआयच्या दुसऱ्या सार्वजनिक आरोग्य परिषद -२०२१ मध्ये बोलत होते.
कोरोना लस सक्षमीकरण गटाचे चेअरमन डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले, की कोविन अॅपचे ओपन सोर्स व्हर्जन तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ज्या देशांना कोविनची यंत्रणा हवी आहे, त्यांना मोफत देण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.
हेही वाचा-बॅटरीवर चालणारा मास्क..! करणार कोरोना, म्युकर मायकोसिस विषाणूला प्रतिबंध
कोविन प्लॅटफॉर्म हे जगभरात लोकप्रिय झाले आहे. केंद्रीय आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, नाजजेरिया आणि पनामा या आदी देशांनी कोविनच्या यंत्रणा घेण्याकरिता तयारी दर्शविली आहे.
हेही वाचा-वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!
ऑनलाईन ग्लोबल कॉनक्लेव्ह ५ जुलैला घेण्यात येणार
आरोग्य आणि तंत्रज्ञानातील तज्ज्ञांचे ऑनलाईन ग्लोबल कॉनक्लेव्ह हे ५ जुलैला घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आर.एस. शर्मा यांनी दिली. यावेळी ही यंत्रणा कशी काम करते, याची माहिती आम्ही जगाला सांगणार आहोत. व्हिएतनाम, इराक, डोमिनिकन रिपब्लिक, संयुक्तर अरब अमिराती या देशांनी लसीकरण मोहिम राबविण्यासाठी कोविन यंत्रणा घेण्याची तयारी दाखविली आहे.
हेही वाचा-काश्मीर पोलिसांना मोठे यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडरला अटक