ETV Bharat / bharat

Goa Winning Women : गोव्याच्या 301 उमेदवारांत केवळ 26 महिलांना उमेदवारी तीघीं जिंकल्या त्याही जोडीने - गोवा निवडणूक २०२२

निवडणुकांत महिलांना दिली जाणारी उमेदवारी (Women Candidates in Election) हा चर्चेचा मुद्दा असतो. प्रत्यक्षात मात्र त्यांना डावलण्यात येते. त्यामुळे त्यांचा सत्तेतला वाटा कमी होतो. गोव्यातही 40 जागांसाठी तब्बल 301 उमेदवार उभे होते. त्यात महिलांची सख्या केवळ 26 होती (Out of 301 candidates in Goa, only 26 are women) त्यातील केवळ 3 निवडुन आल्या आहेत विशेष म्हणजे त्या त्यांच्या पतीसह निवडून (Three of them won with husband) आल्या आहेत.

Goa Winning Women
गोवा विजेत्या महिला
author img

By

Published : Mar 10, 2022, 6:35 PM IST

हैद्राबाद: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात 40 पैकी केेवळ 3 जागांवर महिला उमेदवारांना (Women Candidates in Election) यश मिळाले. गोवा निवडणुकित एकुन 301 उमेदवारांनी लढत दिली सर्वच पक्षांनी मिळुन केवळ 26 महिला (Out of 301 candidates in Goa, only 26 are women) उमेदवारांना संधी दिली होती. या निवडुन आलेल्या तीघींच्याही पतींचे त्या त्या मतदार संघात चांगले वर्चस्व आहे. त्या आधारावरच त्यांना तिकीट मिळाल्याचे सांगण्यात येत होते. या तीघीही निवडुन आल्या आहेत तसेच त्यांचे पतीही निवडून आले आहेत.

गोवा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वंच पक्षांनी महिला सक्षमीकरणा चा मुद्दा घेतला पण गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election 2022) 40 जागांसाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती यासह अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल नेही नशीब अजमावाय साठी कंबर कसली होती. गोव्यात 11 लाख 56 हजार 762 मतदाते आहेत. यात 5 लाख 62 हजार 790 पुरुष आणि 5 लाख 93 हजार 968 महिलांचा समावेश आहे. गोव्यात 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण यात फक्त 26 महिला उमेदवारांना तिकिट मिळाले होते. 25 मतदारसंघ असे होते ज्यात एकही महिला उमेदवार दिलेला नव्हता. तर सात मतदारसंघात एक एक महिला उमेदवार दिला होता. सहा मतदारसंघात प्रत्येकी 2 महिला उभ्या होत्या, एका मतदारसंघात 2 महिला आणि एका मतदारसंघात 4 महिला निवडणुकीत उभ्या होत्या. 301 उमेदवारांमधे एकूण 26 महिला उमेदवार रिंगणात होत्या. यातील चार महिला उमेदवारांचे वय हे 25 ते 35, चौदा महिला उमेदवारांचे वय हे 36 ते 45, पाच महिला उमेदवारांचे वय हे 46 ते 55, एका महिला उमेदवाराचे वय 56 ते 65 आणि दोन महिला उमेदवार वय हे 65 पेक्षा जास्त होते.

पक्षनिहाय महिलांची उमेदवारी पाहिली तर 6 अपक्ष महिला उमेदवार रिंगणात होत्या. भारतीय जनता पक्षाने 40 जागावर उमेदवार उभे केले होते. यापैकी केवळ 3 महिला उमेदवारांना संधी दिली होती. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 39 जागा लढवल्या. या पैकी 3 जागांवर महिलांना प्रतिनिधित्व दिले. क्रांतिकारी गोवा पक्षाने 38 जागा लढवल्या या पक्षाने 2 महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने 37 जागा लढविल्या या पैकी 2 महिलांना तिकिट दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाने 26 जागा लढवल्या. त्यांनी 4 महिलांना उमेदवारी दिली होती. एमएजी पक्षाकडून 1 आणि एसएस पक्षाने 11 जागा लढववल्या त्यात त्यांनी 2 महिलांना रिंगणात उतरवले होते. तर गोयंचो स्वाभिमान पक्षाने चार जागा लढवल्या त्यांनी एका महिलेला तिकिट दिले. यासोबत एसबीपी पक्षाने तीन ठिकाणी उमेदवार उतरवले यात त्यांनी 2 महिलांना तिकिट दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने गोव्यात युती केली असून राष्ट्रवादी काँग्रेस 13 तर शिवसेनेने 9 जागांवर निवडणूक लढवली. मात्र, गोव्यामध्ये त्यांनी एकाही महिलेला प्रतिनिधित्व दिले नव्हते. तसेच तृणमूलसोबत युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही.

कित्येक महिलांच्या पतीचे मतदारसंघात वजन असल्याने त्यांना तिकीट दिले गेल्यचे पहायला मिळाले. भाजपाने पणजी मतदारसंघातून बाबुष मोन्सेरात तर त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना तालीगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विश्वजित राणे यांना वालपाई तर त्यांची पत्नी डॉ विद्या राणे यांना पर्यें मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर काँग्रेसने नुकतेच भाजपला रामराम ठोकून पक्षात आलेल्या मायकल लोबो यांना कलंगुट तर त्यांची पत्नी डीलियाना यांना शिवोली मतदारसंघातून उमेदवारी दिली. 26 पेकी केवळ या तीन महिला गोवा विधानसभे साठी जोडीने निवडुन आल्या आहेत.

2002 मध्ये राजकीय पक्षांनी 11 महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी केवळ एकच महिला निवडून आली होती. 2007 मध्ये 14 महिलांना आणि 2012 मध्ये 10 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्येकी 1 महिला निवडून आली होती. 2017 चा विचार केला तर 19 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात केवळ 2 महिला निवडून आल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.