ETV Bharat / bharat

Tiranga March: विरोधी पक्षांनी काढला तिरंगा मार्च.. खरगे म्हणाले, सत्ताधारी पक्षाने बोलू दिले नाही

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 चा आज शेवटचा दिवस आहे. लोकसभेचे कामकाज आजही तहकूब करण्यात आले आहे.

author img

By

Published : Apr 6, 2023, 12:56 PM IST

OPPOSITION PARTIES TAKE OUT TIRANGA MARCH FROM PARLIAMENT HOUSE TO VIJAY CHOWK TODAY
विरोधी पक्षांनी काढला तिरंगा मार्च.. खरगे म्हणाले, सत्ताधारी पक्षाने बोलू दिले नाही

नवी दिल्ली : काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद भवन ते विजय चौक असा 'तिरंगा मार्च' काढला. काँग्रेससह समविचारी विरोधी पक्षांचे खासदार आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), समाजवादी पार्टी (एसपी), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) सारख्या डाव्या पक्षांचे खासदार सकाळी 11.30 वाजता मोर्चात सामील झाले.

संसदेत बोलू दिले नाही: मोर्चानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खरगे म्हणाले की, मोदी सरकार केवळ लोकशाहीच्या गप्पा मारते. विरोधकांना बोलू न देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 चे दुसरे सत्र विस्कळीत झाले. दुसरीकडे, अदानी मुद्द्यावर त्यांनी गौतम अदानी यांची संपत्ती अडीच वर्षांत एवढी कशी वाढली, असेही त्यांनी विचारले. हल्लाबोल करताना खर्गे म्हणाले की, संपूर्ण विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रातील मोदी सरकार या विषयावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? देशाची संपत्ती वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आधीच केली होती घोषणा: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी समन्वय दर्शविला आहे आणि 13 मार्चपासून त्याचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून संयुक्त निदर्शने केली आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, हे अधिवेशन संपल्यानंतर विरोधी खासदार तिरंगा मोर्चा काढतील. भविष्यातही विरोधी पक्ष एकत्र येऊन काम करतील, असेही ते म्हणाले होते. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले होते की, 'हा तिरंगा मोर्चा संसद भवन ते विजय चौकापर्यंत काढण्यात येणार आहे.'

सत्ताधारीच आहेत जबाबदार: अधिवेशनातील कामकाज विस्कळीत होण्यास सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उल्लेखनीय आहे की, केरळमधील वायनाड संसदीय जागेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २०१९ च्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.

गदारोळामुळे आला व्यत्यय: 13 मार्चपासून सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेत वारंवार व्यत्यय येत आहे. अदानी समूहाच्या बाबतीत जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. दुसरीकडे, लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे.

हेही वाचा: राष्ट्र प्रथम हाच आमचा अजेंडा, पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.