मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बॉम्बे हाय जवळच्या पी 305 बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या युद्धवाहू नौकेकडून वाचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत . 17 मे रोजी सुरू झालेल्या बचावकार्य दरम्यान आतापर्यंत पी 305 वरील 125 क्रू मेंबर्सला मुंबईत सुरक्षित आणण्यात आले आहे. पी 305 व टग वरप्रधा या दोन ठिकाणी बचावकार्य दरम्यान आतापर्यंत 26 क्रू मेंबरचे मृतदेह मिळाले आहेत. पी 305 बार्जवरील 186 क्रू कर्मचाऱ्यांना वाचण्यात आले असून, टग वरप्रदावरील 2 क्रू मेंबरला वाचविण्यात आले आहे.
'बार्ज पी३०५' बचावकार्य LIVE : १८५ जणांना वाचवले; 22 मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर - तौक्ते चक्रीवादळ रेस्क्यू
21:35 May 19
पी-305 बार्जवरून 26 कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाले
17:32 May 19
22 कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर
मुंबई - ‘बॉम्बे हाय’ परिसरात अडकलेल्या १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर आता 22 जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत.
13:35 May 19
आतापर्यंत ३४ मृतदेह आढळले..
तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या अरबी समुद्रातील P305 या बार्ज वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची व आयएनएस कोलकाता या दोन नौकांनी मदत कार्य सुरू केले होते. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 34 जणांचा मृत्यू झालेला असल्याचं नौदलाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातील 16 मृतदेह आयएनएस कोची मधून आणण्यात आलेले असून कोलकाता मधून इतर कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन येण्यात येत आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आलेला नाहीये.
12:47 May 19
नौदलाने जारी केले हेल्पलाईन नंबर..
नौदलाकडून बार्जवरील कर्मचाऱ्यांबाबत माहितीसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. हे नंबर पुढीलप्रमाणे :
ओएनजीसी हेल्पलाईन :
- 022-2627 4019
- 022-2627 4020
- 022-2627 4021
पवन गोस्वामी : 8802062853
करनदीप सिंह : 9987548113, 022-71987192
12:41 May 19
१४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर..
बार्जवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सुमारे ८० लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
12:40 May 19
नौदलाने आपल्या जीवाची बाजी लावून आमचा जीव वाचवला : कर्मचारी
नौदलाने आपल्या जीवाची पर्वा न करता आमचा जीव वाचवला. त्यामुळे त्या जवानांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया बार्जवरील एका कर्मचाऱ्याने दिली.
12:37 May 19
नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर..
मुंबई : 'बार्ज पी३०५' वरील १८५ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आतापर्यंत नौदलाला यश मिळाले आहे. यांपैकी काही कर्मचाऱ्यांना नौदलाच्या आयएनएस कोची जहाजाने किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर बार्जवरील एका कर्मचाऱ्याला परिस्थितीबाबत विचारणा केली असता, तो अगदीच भावनिक झाला. नौदलाचे जवान नसते, तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो. केवळ नौदलामुळेच आम्ही हा दिवस पाहू शकलो असल्याचे त्याने सांगितले. हे सांगताना त्या कर्मचाऱ्याचे अश्रू अनावर झाले.
12:26 May 19
११ तास होतो पाण्यात.. मग नौदलाने वाचवला जीव : कर्मचारी
बार्ज बुडायला लागल्यामुळे आम्ही शेवटचा पर्याय म्हणून पाण्यात उड्या मारल्या. आम्ही लाईफ जॅकेट घातले होते. मात्र, वादळामुळे पाण्यात बुडण्याची शक्यताही होती. तब्बल ११ तास मी पाण्यात होतो. त्यानंतर नौदलाने येऊन आमचा जीव वाचवला. त्यासाठी नौदलाचे अनेक धन्यवाद, अशी प्रतिक्रिया बार्जवरील एका कर्मचाऱ्याने दिली.
12:10 May 19
मोहीम अवघड, मात्र लोकांना वाचवण्यात यश - मनोज झा (नौदल अधिकारी)
मुंबई : अशा प्रकारच्या मोहिमा या नेहमीच अवघड असतात. केवळ आपत्कालीन स्थिती आहे म्हणून अतातायीपणा करणे शहाणपणाचे नसते. आतापर्यंत १८५ लोकांना आम्ही वाचवले आहे. सर्व सुरक्षा दलांनी मिळून काम केल्यामुळे ही मोहीम यशस्वी होताना दिसून येत आहे. या बार्जवरील सुमारे ३०० लोक आणखी दोन जहाजांच्या मदतीने समुद्रात निघण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र, आम्ही त्यांना बार्जवर थांबण्यासाठी सांगितले, तसेच आम्ही त्यांना वाचवू असा विश्वासही त्यांना दिला. त्यामुळे या सर्व लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. हे सर्व जर दुसऱ्या जहाजांमधून समुद्रात निघाले असते, तर मात्र ही मोहीम आणखी अवघड झाली असती.
सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ नौदलच नाही, तर तटरक्षक दलही आमची मदत करत आहेत. नौसेनेच्या जहाजांबाबत बोलायचे झाल्यास; आयएनएस व्यास, आयएनएस बेतवा, आयएनएस तेग आणि आयएनएस कोलकाता हे अजूनही समुद्रात आहेत. तसेच, आमचे हेलिकॉप्टरही बचावकार्यात सहभागी आहेत. आयएनएस कोचीदेखील वाचवलेल्या लोकांना किनारी सोडून पुन्हा समुद्रात शोधमोहिमेसाठी रवाना होईल. बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे नौदल अधिकारी मनोज झा यांनी याबाबत माहिती दिली.
12:06 May 19
परिस्थिती सध्या नियंत्रणात - कॅप्टन सचिन (आयएनएस कोची)
मुंबई : दोन दिवसांपूर्वी जी गंभीर परिस्थिती होती, ती आता नियंत्रणात आहे. आयएनएस कोची नेहमीच अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार राहील. सध्या समुद्रात सहा जहाजे बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. तसेच, हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे अशी माहिती आयएनएस कोचीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन यांनी दिली..
11:50 May 19
बार्ज पी३०५ बचावकार्य LIVE Updates : आतापर्यंत १८५ जणांना वाचवण्यात यश
मुंबई - अरबी समुद्रात अडकलेल्या P-305 या बाजूवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू आहे. यासाठी आयएनएस-कोची या युद्ध नौकेच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 185 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी 124 जणांना मुंबईत सुरक्षित आणण्यात आलेले आहे. या बार्जवर एकूण २६१ कर्मचारी होते.
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या P-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरची सुद्धा या बचाव कार्यात मदत घेतली जात आहे. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून आतापर्यंत 185 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. यामध्ये आयएनएस कोची या युद्ध नौकेच्या सहाय्याने या नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे.