ETV Bharat / bharat

One Nation One Election First Meeting : 'वन नेशन वन इलेक्शन' कमिटीच्या पहिल्या बैठकीत घेतला 'हा' निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 9:27 PM IST

One Nation One Election First Meeting : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वन नेशन वन इलेक्शनसंदर्भात स्थापन केलेल्या समितीसोबत शनिवारी पहिली बैठक घेतली. या बैठकीत सदस्यांनी चर्चा करून संबंधित राजकीय पक्षांकडून सूचना घेण्याचं ठरवलंय. वन नेशन वन इलेक्शन कमिटीची पहिली बैठक जोधपूर हॉस्टेलमध्ये झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

One Nation One Election First Meeting
One Nation One Election First Meeting

नवी दिल्ली One Nation One Election First Meeting : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची दिल्लीत बैठक झाली. देशात लोकसभा, विधानसभा, नागरी संस्थांसह सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी पहिल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

राजकीय पक्षांचं मत विचारात घेणार : या मुद्द्यावर आधी सर्व राजकीय पक्षांचं मत जाणून घेण्याचंही ठरलंय. याअंतर्गत लवकरच सर्व राजकीय पक्षांना सूचना देण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. समितीनं आपल्या पहिल्याच बैठकीत कायदा आयोगाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधीर रंजन बैठकीला अनुउपस्थित : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीत लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी वगळता सर्व सदस्यांनी सहभाग घेतला होता. या समितीत समाविष्ट असलेले ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे देशाबाहेर असल्यानं त्यांनी बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं सहभाग घेतला.

विधी आयोगाचे मत विचारात घेणार : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल, माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष कश्यप, पंधराव्या अर्थसंस्थेचे माजी अध्यक्ष एनके सिंग, माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी प्रामुख्यानं उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला कोविंद यांनी बैठकीबाबत माहिती दिली. या काळात समितीनं आपले काम पुढं नेण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रथम, ते सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष, राज्यांचे सत्ताधारी राजकीय पक्ष, संसदेत प्रतिनिधित्व करणारे पक्ष आणि इतर मान्यताप्राप्त राज्याचे राजकीय पक्ष यांच्याशी एक-एक करून या विषयावर चर्चा करण्यात येईल. दुसरे म्हणजे या मुद्द्यावर विधी आयोगाचे मतही घेतले जाणार आहे. भारतीय राज्यघटनेतील कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका, पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. One Nation One Election : एक राष्ट्र-एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  2. One Nation one election : संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी
  3. एक देश एक निवडणूक : प्रक्रिया राबवणे कठीण मात्र फायदेही आहेत अनेक..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.