दुर्गापूर (प. बंगाल) - दुर्गापूर स्टील प्लांट (DSP) च्या परमनंट वे इंजिनिअरिंग (PWE) विभागात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पल्टू बौरी असे मृताचे नाव आहे. प्रशांत बॅनर्जी, प्रशांत घोष आणि गोपीराम अशी जखमींची नावे आहेत.
जखमींची स्थिती गंभीर - सकाळी 10.45 च्या सुमारास 2 क्रमांकाच्या ब्लास्ट फर्नेसमध्ये गरम कंटेनर उलटल्याने हा अपघात झाला. जखमींना गंभीर स्थितीत तातडीने दुर्गापूर येथील खाजगी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्वजण पीडब्ल्यूई विभागात कार्यरत असलेल्या मॉडर्न टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. पीडब्ल्यूई विभागाचे काम हे रेल्वे रूळांच्या दुरुस्तीचे आहे.