नवी दिल्ली - भाजपचे वरिष्ठ नेता आर. के. सिन्हा म्हणाले, की लोकसंख्या नियंत्रणाची खूप चर्चा सुरू आहे. त्याबाबत उत्तर प्रदेश सरकारने विधेयक आणणार आहे. इतर राज्यांनी त्याबाबत विचार करायला पाहिजे. केंद्र सरकारनेही त्याबाबत पुढाकार घ्यायला हवा.
चीनप्रमाणेच पत्नी आणि पतीने एका मुलाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. कमीत कमी लोकसंख्येचे प्रमाण कमी होईपर्यंत हे नियोजन पुढील पंधरा वर्षे सुरू ठेवायला हवे.
उत्तर प्रदेशात लागू होणार लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा-
उत्तर प्रदेश सरकार हे लोकसंख्या नियंत्रणावर कायदा आणत आहे. उत्तर प्रदेश कायदा आयोगाने त्यासाठी कच्चा आराखड्या करण्यास सुरुवात केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पालकाला दोनहून अपत्ये झाल्यास त्या व्यक्तीला सरकारच्या सुविधा आणि अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
हेही वाचा-जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक सुरू; 'हे' नेते उपस्थित
योगगुरू रामदेव बाबांनीही लोकसंख्या नियंत्रणाची केली होती मागणी
योगगुरू रामदेव बाबांनी २०१९ मध्ये देशातील लोकसंख्या नियंत्रणाची मागणी केली होती. ते म्हणाले होते, की ही एक मोठी समस्या असून सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आगामी काळात संसाधनांची कमतरता भासणार असून त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचा अधिकार कोणालाही दिला जाऊ नये. तिसरे मूल झाल्यास त्याला मतदानाचा, निवडणूक लढवण्याचा, आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार नाकारावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले होते. येत्या ५० वर्षात देशाची लोकसंख्या १५० कोटींपेक्षा अधिक वाढता कामा नये, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा-SCO meet पाकमधील दहशतवाद संघटनांविरोधात अजित दोवालांची कठोर भूमिका, म्हणाले...
देशापुढील खरा प्रश्न लोकसंख्या नसून बेरोजगारी
देशाच्या विकासासाठी दोन अपत्ये जन्माला घालण्याचा कायदा आणला जावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते. त्यावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली होती. देशापुढील खरा प्रश्न लोकसंख्या नसून बेरोजगारी आहे, असे उत्तर एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जानेवारी २०२० मध्ये म्हटले होते.