तिरुअनंतपुरम - दीड वर्षाच्या चिमुरडीचा बादलीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेदुमनगड येथील शामनाद मंझील येथील सिद्दिक-सजिना दाम्पत्याची धाकटी मुलगी नैना फातिमा हिच्यासोबत मंगळवारी (दि. 14 जुन)रोजी संध्याकाळी ही दुःखद घटना घडली.
ही घटना घडली तेव्हा घरात फक्त आई आणि बाळ होते. अर्भक बुडत असताना आई नमाज पठण करत असल्याने तिला ही घटना लक्षात आली नाही. या चिमुरडीला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही. तिच्या पश्चात तिच्या आई-वडिलांशिवाय, तिच्या दोन मोठ्या बहिणी आलिया फातिमा आणि आसना फातिमा या आहेत.