भोपाळ : पंचायतमध्ये तैनात असलेल्या महिला ग्रामीण रोजगार सहाय्यकाचे तिच्या पतीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने पोलिसांत दाद मागितल्यानंतर पोलिस सक्रिय झाले, मात्र ही बातमी कळताच पतीने अपहरण केलेल्या पत्नीला गायब केले. नंतर पीडितेच्या भावाने मंत्र्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीसही सक्रिय झाले आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेतली, मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहेत.

काय आहे प्रकरण : बेरसिया परीसरातील ग्रामपंचायतीचे हे प्रकरण आहे, अपहरण झालेल्या मुलीचे लोक गावापासून दूर शेतात राहतात. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक एक बोलेरो गाडी घराबाहेर थांबली आणि त्यातून ३-४ पुरुष बाहेर आले, महिलेने दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी मुलीला आणि तिच्या आईला बोलेरामध्ये बसण्यास भाग पाडले. त्यांना घेऊन गंजबासोडा येथे नेले, मात्र नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर आरोपीने आईला सोडले, परंतु मुलीला सोडले नाही.
गृहमंत्र्यांना पत्र : आई परत येताच सोबत तिच्या मुलासह तिने पोलिस ठाण्यात कैफियत मांडली, त्यानंतर पोलिस सक्रिय झाले आणि 3 दिवसांनी मुलीला आनण्यासाठी निघाले तेव्हा मुलगा आणि मुलगी घरी नसल्याचे समजले. त्यामुळे शेवटी पोलिसांना तसेच परतावे लागले. त्यानंतर मुलीचा भाऊ भूपेंद्र याने २६ मार्च रोजी पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि एक पत्र गृहमंत्र्यांना तसेच डीजीपीला टॅग केले त्यानंतर २७ मार्च रोजी पोलिस सक्रिय झाले आणि मुलीचा शोध घेतला, रात्री मुलीला परत आणले.

तिसरे लग्न केले होते, म्हणून : मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, १४ जून २०२२ रोजी माझे लग्न गंजबासोडा येथील दीपक याच्याशी झाले होते, जेव्हा मी लग्न करून सासरच्या घरी पोहोचले. तेव्हा माझ्या पतीचे हे तिसरे लग्न असल्याचे मला समजले. यानंतर मी दुसर्या दिवशी स्वतः घरी आले व सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. माझ्या वडिलांनी समाज व नातेवाईकांच्या भीतीने मला तडजोड करण्यास सांगितले पण मी तसे केले नाही.

पोलीसांना काॅल करुन कळवले : हे मला मान्य नव्हते आणि माझ्या आईनेही मला पाठिंबा दिला. कोणताही करार झाला नाही तेव्हा दीपकला याचा राग आला आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मला माझी ईच्छा नसताना मला न्यायला आला, पण नंतर मी 100 नंबर वर कॉल करून स्वत: ला वाचवले. दीपकने रात्री मला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानी तसे नियोजन केले आणि तो यशस्वीही झाला, पण पोलिसांनी मला त्यातून वाचवले. सध्या तरी दीपक आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
हेही वाचा : Nanded News: सकाळी उशिरा उठण्याच्या कारणामुळे पत्नीला जाळले; पतीला जन्मठेप