ETV Bharat / bharat

Ramdev Baba criticizes Pakistan : पाकिस्तानचे चार तुकडे होणार, बाबा रामदेवांची भविष्यवाणी - प्रजासत्ताक दिन 2023

हरिद्वार येथील पतंजली योगपीठ येथे आज (गुरुवारी) ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाबा रामदेव यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. यानंतर केलेल्या भाषणात रामदेव यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे होणार असल्याची राजकीय भविष्यवाणीही त्यांनी केली. पाकिस्तानचे विभाजन झाल्यावर कोणकोणते भाग तयार होतील, त्यांची नावेही बाबा रामदेव यांनी सांगितली.

Ramdev Baba criticizes Pakistan
बाबा रामदेव
author img

By

Published : Jan 26, 2023, 10:50 PM IST

रामदेव बाबांची पाकिस्तानवर टीका

हरिद्वार (उत्तराखंड) : भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योगगुरू बाबा रामदेव यांनीही पतंजलीमध्ये आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत तिरंगा फडकवला. यावेळी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत पतंजली समूहाचे सर्व कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे होणार आहेत. पाकिस्तान हा छोटा देश म्हणून शिल्लक राहील.

बाबा रामदेव मीडियाशी संवाद साधताना

'भारतम् शरणम् गच्छामि'ची घोषणा : योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, बलुचिस्तान, पीओके आणि पंजाब प्रांत वेगळे राष्ट्र बनतील. पाकिस्तान हा छोटा देशच शिल्लक राहील. काही वर्षांनी पीओकेही भारतात विलीन होईल. त्यानंतर बलुचिस्तानचसुद्धा भारतात सामील होईल. यानंतर तोसुद्धा 'भारतम् शरणम् गच्छामि' म्हणेल. कारण पंजाब, सिंध हे सर्व भारताचे मित्र आहेत. त्यांच्यात सांस्कृतिक एकरूपता आहे. पंजाब, सिंध प्रांतही भारतात विलीन होतील. यानंतर भारत महासत्ता बनेल, ही येणाऱ्या काळाची हाक आहे आणि हे होणारच असा दावा बाबा रामदेव यांनी केला.

पाच लाख लोकांना रोजगार : यादरम्यान सर्व देशवासियांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना बाबा रामदेव म्हणाले की, देशाला आर्थिक गुलामगिरी, लूट आणि विध्वंसातून वाचवण्याची आज आपण शपथ घेतली पाहिजे. त्याचबरोबर भारताला शिक्षण, औषधोपचाराची लूट आणि गरिबीपासून मुक्त करू. आपले सांस्कृतिक वैभव आणि अभिमान सोबत घेऊन निरोगी, समृद्ध आणि सुसंस्कृत भारत घडवण्याचा निर्धार करूया, असे रामदेवबाबा म्हणाले. सर्व देशवासीयांनी त्यांच्या भागाची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही आतापर्यंत 5 लाख लोकांना रोजगार दिला आहे. येणाऱ्या काळात आणखी 5 लाख लोकांना रोजगार देण्याचा संकल्प रामदेवबाबांनी केला.

बाबा रामदेवांच्या पोस्टरला काळे फासले : कोल्हापूरातील पतंजलीच्या सर्व दुकानातील रामदेव बाबांच्या पोस्टर्सना 28 नोव्हेंबर, 2022 रोजी काँग्रेसने काळे फासत तीव्र घोषणाबाजी केली . महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत कोल्हापूर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

रामदेव बाबांच्या मालावर बहिष्कार : कोल्हापूरातील पतंजलीच्या सर्व दुकानातील रामदेव बाबांच्या पोस्टर्सना काँग्रेसने काळे फासत तीव्र घोषणाबाजी केली. शिवाय दुकानेही बंद करायला भाग पाडले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत कोल्हापूर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय पतंजलीला श्रद्धांजली अशा घोषणांमधे रामदेव बाबांच्या मालावर बहिष्कार घालण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

दुकाने बंद करावीत : दरम्यान, कोल्हापूर शहरातील सर्व पतंजली दुकाने बंद करावी अशी काँग्रेसने विनंती केली होती. शिवाय पतंजली दुकानाच्या पोस्टरवर असणाऱ्या रामदेव बाबांच्या फोटोलाही काळे फासण्यात आले होते. कोल्हापूरमधील पतंजली दुकानधारकांनी दुकान बंद करून पतंजलीच्या उत्पादन विकली जाणार नाहीत, याची कबुली द्यावी. असेही यावेळी मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा : Shivsena VBA Alliance : ठाकरे गट-वंचितच्या आघाडीने बदलणार समीकरणे? 'वंचित'ने सोडली होती तीन मतदारसंघांत छाप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.