नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने शेतकऱ्यांना रसायन मुक्त शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, पृथ्वीला नापीक होण्यापासून वाचवण्याचा एक मार्ग म्हणजे सेंद्रिय शेती. त्यामुळे शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेती पद्धतीकडे वळणे (Chemical-free method of cultivation) काळाची गरज बनली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान किसान सम्मान योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 10 वा हप्ता (releases 10th installment) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी शेतकऱ्यांना हे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपली पृथ्वी नापीक होण्यापासून वाचवण्याचा एक मोठा मार्ग म्हणजे रसायनमुक्त शेती. (Chemical-free method of cultivation) म्हणूनच, गेल्या वर्षभरात, देशाने आणखी एक दूरदर्शी प्रयत्न सुरू केला आहे तो म्हणजे नैसर्गिक शेती. मी माझ्या शेतकरी मित्रांना रसायनमुक्त शेतीकडे जाण्याचे आवाहन करतो. आज, 2022 मध्ये प्रवेश करत असताना, नवीन आव्हानांमध्ये स्वतःला सामील करून घेण्याचे हे वर्ष आहे."
मोदी म्हणाले, शेतकर्यांसाठी एक उपक्रमही सुरू करण्यात आला आहे ज्यामध्ये त्यांना पिकांचे अवशेष, खोड इत्यादींमधून पैसे मिळतील. शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष, खोड इत्यादींमधून पैसे मिळावेत यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी अवशेषांपासून जैवइंधन बनवण्यासाठी देशभरात शेकडो नवीन युनिट्स उभारण्यात येत आहेत," असे मोदी म्हणाले.
- काय म्हणाले पंतप्रधान?
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नववर्षाची सुरुवात देशाच्या अन्नदात्यांसोबत करणे हा आपला सन्मान आहे. देशाच्या विकासाला नवी गती आणि ऊर्जा देण्यासाठी भारतीय नागरिक प्रयत्न करत आहेत. गेल्या सात वर्षांत सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. लहान शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
- कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग -
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हा उद्देश ठेवून पंतप्रधान किसान सम्मान योजना सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे या योजनेचे दहावा हप्ता आज देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकार वर्षाला देशातील शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये देत असते. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे.
- काय आहे पीएम किसान सम्मान योजना -
पीएम-किसान योजनेअंतर्गत ( PM KISAN scheme ) वर्षभरात पात्र शेतकऱ्याला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये अशी दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 1.6 लाख कोटी रुपये ( Samman Rashi ) वितरित केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून 351 शेतकरी गट संस्थांना ( Farmer Producer Organizations ) 14 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला जाणार आहे. त्याचा सुमारे 1.24 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.