हैदराबाद ( तेलंगणा ) : दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार पावलेला कोरोनाचा ओमिक्रॉन सब-व्हेरियंट 'BA.4' भारतात दाखल झाला ( OMICRON BA4 ) आहे. या महिन्याच्या 9 तारखेला हैदराबादमध्ये या प्रकाराचा आढळून आला आहे. Indian SARS Cov-2 Consortium on Genomics (INSACOG) ने गुरुवारी याचा खुलासा केला. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका डॉक्टरला ओमायक्रॉन BA4 प्रकाराचे निदान झाले होते.
मेडिकल रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका शास्त्रज्ञाचा असा विश्वास आहे की, या उप-प्रकारची प्रकरणे देशभरातील शहरांमध्ये जास्त प्रमाणात नोंदवली जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोविड प्रसारासाठी जबाबदार असलेल्या दोन ओमायक्रॉन उप-प्रकारांपैकी एक 'BA4' देखील आहे. यापूर्वी कोविडच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये याचे निदान झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट जास्त धोकादायक नाही, मात्र, त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो.
ओमिक्रॉनचा भारतात यापूर्वी एकदा प्रसार झाल्यामुळे आणि लसीकरणाच्या व्यापक अंमलबजावणीमुळे BA4 चा परिणाम नगण्य असू शकतो असे अनेक तज्ञांचे मत आहे. "बीए 4 सब-व्हेरियंटमुळे काही दिवसात प्रकरणे वाढू शकतात. याची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही," असे राष्ट्रीय रोग केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.