ETV Bharat / bharat

अमित शाह बेपत्ता...? एनएसयूआय नेत्याने नोंदवली तक्रार

author img

By

Published : May 12, 2021, 10:09 PM IST

Updated : May 13, 2021, 4:45 PM IST

बंगाल निवडणुकीमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करणारे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना महामारीत आघाडीवर नसल्याचे पाहायला मिळत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करीयप्पा यांनी गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. बंगालच्या निवडणुकीदरम्यान ते हरवल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

अमित शाह
अमित शाह

नवी दिल्ली - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतच आहेत. यातच बंगाल निवडणुकीमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करणारे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना महामारीत आघाडीवर नसल्याचे पाहायला मिळत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करीयप्पा यांनी गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. बंगालच्या निवडणुकीदरम्यान ते हरवल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही कोरोना कालावधीत लोकांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून आहोत. सध्याचे सरकार आणि त्याच्या प्रमुख नेते गायब झाले आहेत. त्यामुळे आम्ही ते हरवले असल्याची तक्रारी नोंदवली आहे. आम्हाला आशा आहे की देशाचे गृहमंत्री लवकरच सापडतील आणि त्यानंतर ते आपले कर्तव्य पार पाडतील, असे नागेश करीयप्पा यांनी म्हटलं.

देश कोरोना साथीने झगडत आहे आणि देशातील प्रत्येक नागरिक संकटात सापडला आहे. त्यावेळी राजकारण्यांचे कर्तव्य आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षाशी विशेष न राहता संपूर्ण देशाला उत्तर देतील. परंतु जेव्हा देशातील जनतेला त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा ते अदृश्य असतात, असे नागेश करीयप्पा यांनी म्हटलं आहे.

शाह यांच्यावर टीका -

नेते हे लोकांचे प्रतिनिधी असतात. संकटाच्या काळात पळवाट शोधण्यासाठी नाही. तर देशाची सेवा करण्यासाठी त्यांना निवडलेले असते, असे करीयप्पा म्हणाले. तसेच गृहमंत्री अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे नेते, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा - 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; मांडले हे मुद्दे

Last Updated : May 13, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.