लखनऊ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रामचरितमानसच्या प्रती जाळल्याप्रकरणी दोन आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एडीसीपी पूर्व सय्यद अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात बंद असलेले पीजीआय येथील रहिवासी सलीम आणि सैनिक नगर येथील रहिवासी सत्येंद्र यांच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
१० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : एडीसीपी पूर्व सय्यद अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी पीजीआय पोलीस स्टेशन परिसरात रामचरितमानसच्या प्रती जाळल्याप्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, लखनऊ यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (NSA) कलम 3 मधील उपकलम 2 अन्वये आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश रविवारी जिल्हा कारागृह, लखनऊमध्ये दिले होते. एडीसीपी पूर्व सय्यद अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐशबाग तेथील रहिवासी भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतनाम सिंग उर्फ लवी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजाच्या भावना दुखावण्याचा आरोप : रामचरितमानसच्या प्रती जाळून या लोकांनी समाजाच्या भावना दुखावण्याचा, जातीय दंगली, द्वेष पसरवण्याचा, लोकांना हिंसाचारासाठी भडकवण्याचा, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतनाम यांनी केला आहे. यानंतर तात्काळ सैनिक नगरचे सत्येंद्र कुशवाह, आलमबागचे यशपाल सिंग लोधी, दक्षिण शहरातील देवेंद्र प्रताप यादव, बलदेव विहार तेलीबागचे नरेश सिंग आणि उत्रेतियाचे सलीम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना आता कोर्टात उभे केले जाणार आहे.
काय आहे प्रकरण? : माजी मंत्री आणि सपा आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या रामचरितमानसवरील विधानाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेने पीजीआय पोलीस स्टेशन अंतर्गत वृंदावन योजना तिराहे येथे २९ जानेवारी रोजी सकाळी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रामचरित मानसच्या प्रतींचे दहन करताना जोरदार घोषणाबाजी केली. महासभेचे पदाधिकारी देवेंद्र यादव म्हणाले होते की, श्री रामचरित मानसमधील अनेक श्लोकांमध्ये जातींबद्दल चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. श्री रामचरित मानसमध्ये लिहिलेले श्लोक काढून टाकण्याचे आणि त्यात बदल करण्याचे निवेदन राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा : Five Judges In Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाला आज मिळतील पाच नवे न्यायाधीश ; संक्षिप्तपणे जाणून घ्या या न्यायाधीशांबद्दल