ETV Bharat / bharat

आता गुगल मॅपवर रस्त्यांची खरी छायाचित्रे दिसणार, भारतातील 'या' दहा शहरांमध्ये सेवा

भारतातील 10 शहरांमधील रस्त्यांची छायाचित्रे आता गुगल मॅपवर पाहता येणार. तंत्रज्ञान कंपनीने यासाठी दोन स्थानिक कंपन्यांशी भागिदारी केली आहे.

real pictures of roads Google Maps india
गुगल मॅप रस्ते चित्र
author img

By

Published : Jul 28, 2022, 1:56 PM IST

नवी दिल्ली - भारतातील 10 शहरांमधील रस्त्यांची छायाचित्रे आता गुगल मॅपवर पाहता येणार. तंत्रज्ञान कंपनीने यासाठी दोन स्थानिक कंपन्यांशी भागिदारी केली आहे. सरकारने यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते आणि इतर ठिकाणांचे व्यापक फलक चित्रे प्रदर्शित करण्यास परवानगी दिली नव्हती. आतापर्यंत गुगल मॅपवर सॅटेलाइट फोटो असायचे, पण आता त्यात खरी छायाचित्रे असतील.

हेही वाचा - कर्नाटकात पीडितेने 12 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराची आता केली तक्रार, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुगलने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रा यांच्या भागिदारीत, रस्ते, गल्ल्यांंचे खरे चित्र पाहण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. निवेदनानुसार, 'रस्त्याचे चित्र आजपासून गुगल मॅपवर उपलब्ध होईल. ही सेवा बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसर येथे असेल.

हे तंत्र मोठ्या चौकांमध्ये रस्त्यावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक वाहतूक प्राधिकरणाला मदत करत आहे. ही प्रणाली संपूर्ण शहरात विस्तारित केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. गुगल कोलकाता आणि हैदराबादमध्ये देखील या प्रणालीचा विस्तार करेल. याशिवाय, या जागतिक कंपनीने हवेच्या गुणवत्तेची माहिती देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी (CPCB) करार करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा - Asia Cup 2022: आशिया चषक '२०२२' स्पर्धेचे ठिकाण बदलले; UAE येथे होणार असल्याची जय शाहांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.